🔴नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster)
Автор: Dyanoba ज्ञानोबा
Загружено: 2025-08-21
Просмотров: 401
Описание:
🔴नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster)
२२. नैसर्गिक आपत्ती
(पाठ्यपुस्तक पान क्र. १३९, परिसर अभ्यास, भाग १ : भूगोल व नागरिकशास्त्र – इयत्ता चौथी)
संकलित मूल्यमापन
१. लेखन सराव (वर्गकार्य / गृहकार्य)
🔴 प्र.१. पुढील वाक्यांत रिकाम्या जागी कंसांतील योग्य शब्द लिहा.
(१) पाण्यात (तरंग) निर्माण होतात, अगदी तसेच जमिनीच्या पोटात निर्माण होतात.
(२) पाऊस थांबला नाही, तर पाणी (वस्तीतही) घुसते.
(३) त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणस (हतबल) असतात.
(४) त्या (ढिगाऱ्यांत) अडकून माणसे दगावतात.
🔴 प्र.२. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
(१) विमान अपघात ही नैसर्गिक आपत्ती होय. – ❌ चूक
(२) त्सुनामीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. – ✅ बरोबर
(३) गारपीट आंब्याच्या पिकाला अनुकूल असते. – ❌ चूक
(४) भूकंपात कच्ची घरे कोसळतात. – ✅ बरोबर
(५) अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. – ✅ बरोबर
🔴 प्र.३. पुढे दिलेले कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
अ. क्र.नैसर्गिक आपत्तीअ. क्र.मानवनिर्मित आपत्ती(१)चक्रीवादळ(२)मोडकळीला आलेले घर कोसळणे(३)वीज कोसळणे(४)दोन आगगाड्यांची टक्कर(६)बर्फ पडणे(५)वाळवी लागलेले झाड पडणे(७)गॅस सिलिंडर फुटणे(८)विमान अपघात
🔴 (२) बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ? त्याचे कारण काय असेल?
उत्तर : त्यांच्या अंगावर केस दाट असतात, कारण थंडीपासून बचाव होतो.
🔴 (३) बर्फ पडणे व गारपीट यांत काय फरक आहे?
उत्तर : बर्फ पडणे म्हणजे सतत थंडीमुळे होणारे बर्फवृष्टी, तर गारपीट म्हणजे ढगातून पडणारे बर्फाचे गोळे.
४. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
🔴 (१) आपल्या देशातल्या पावसाला 'मोसमी पाऊस' का म्हणतात?
उत्तर : कारण ठराविक ऋतूमध्ये पाऊस पडतो.
🔴 (२) हिवाळ्यातला कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो?
उत्तर : वळवाचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो.
🔴 (३) पुराच्या पाण्यात पोहावे का?
उत्तर : नाही, पुराच्या पाण्यात पोहू नये.
🔴 (४) त्सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनांवर काय परिणाम होतो?
उत्तर : वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
🔴 (५) 'नैसर्गिक आपत्ती' म्हणजे काय?
उत्तर : नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या दुर्घटना म्हणजे नैसर्गिक आपत्ती.
🔴 (६) 'अवकाळी पाऊस' म्हणजे काय?
उत्तर : ठराविक हंगामाव्यतिरिक्त पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस.
🔴 (७) 'पूर येणे' म्हणजे काय?
उत्तर : सतत पावसामुळे नदीची पातळी वाढणे म्हणजे पूर.
🔴 (८) 'भूकंप' म्हणजे काय?
उत्तर : पृथ्वी हादरणे म्हणजे भूकंप.
🔴 (९) 'त्सुनामी' म्हणजे काय?
उत्तर : समुद्राखाली भूकंप होऊन तयार होणाऱ्या प्रचंड लाटा म्हणजे त्सुनामी.
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
🔴 (१) 'वळवाचा पाऊस' म्हणजे काय?
उत्तर : पावसाळा सुरू होण्यापूर्वी पडणारा पाऊस म्हणजे वळवाचा पाऊस.
🔴 (२) अवकाळी पावसामुळे लोकांची त्रेधातिरपीट कशा प्रकारे उडते?
उत्तर : कारण पिके नष्ट होतात, घरे कोसळतात व जनावरे मरतात.
🔴 (३) अवकाळी पावसाचे कोणते तोटे होतात?
उत्तर : पिके कुजतात, जनावरे व माणसे जखमी होतात, घरे व नुकसान होते.
🔴 (४) गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत?
उत्तर : माणसे-जाणावरे जखमी होतात, आंबा, फळे व धान्याचे नुकसान होते.
🔴 (५) पुरामुळे कोणते तोटे होतात?
उत्तर : घरे कोसळतात, माणसे व प्राणी बुडून मरतात, दैनंदिन जीवन विस्कळीत होते.
🔴 (६) पुरात कोणती काळजी घ्यावी?
उत्तर : उंच ठिकाणी जावे व पाण्यात पोहू नये.
🔴 (७) भूकंपाचे कोणते दुष्परिणाम होतात?
उत्तर : घरे कोसळतात, माणसे ढिगाऱ्याखाली अडकतात.
🔴 (८) त्सुनामीचे कोणते दुष्परिणाम होतात?
उत्तर : किनारी भागात घरे, दुकाने, वाहने नष्ट होतात; माणसे-प्राणी समुद्रात बुडतात.
🔴 (९) आपत्तीचे कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात?
उत्तर : जीवितहानी, वित्तहानी, घरांचे नुकसान व दैनंदिन जीवन विस्कळीत होणे.
मुक्तोत्तरी प्रश्न
🔴 प्र.१. आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल?
उत्तर : आपत्तीबाबत जागरूक राहून, सुरक्षिततेचे नियम पाळून व मदतकार्य तातडीने करून नुकसान कमी करता येते.
🔴 प्र.२. काय करावे बरे?
उत्तर : गावात पूर आला असल्यास, लोकांनी उंच व सुरक्षित जागी स्थलांतर करावे व मदतकार्य करावे.
तोंडी परीक्षा
🔴 (१) काही नैसर्गिक आपत्तीची नावे सांगा.
उत्तर : भूकंप, पूर, वादळ, गारपीट, त्सुनामी.
🔴 (२) भूकंपाच्या वेळी जीव वाचवण्यासाठी काय करावे?
उत्तर : टेबलाखाली किंवा कॉटखाली बसावे.
22. Natural Disasters
(Textbook Page No. 139, Environmental Studies, Part 1: Geography and Civics – Std. IV)
Summative Evaluation
1. Writing Practice (Classwork / Homework)
🔴 Q.1 Fill in the blanks with the correct words from the brackets:
(1) Waves are formed in water, in the same way (earthquakes) are formed inside the earth.
(waves / earthquake / flood)
(2) If the rain does not stop, water enters (the locality also).
(in the pond / in the tank / in the locality also)
(3) In front of the tsunami’s attack, animals and humans are (helpless).
(active / helpless / stable)
(4) People die trapped under the (debris).
(debris / rain / collision)
🔴 Q.2 Write whether the following statements are True or False:
(1) An airplane crash is a natural disaster. – ❌ False
(2) Tsunami causes large-scale loss of life and property. – ✅ True
(3) Hailstorm is favourable for mango crop. – ❌ False
(4) Kutcha houses collapse in an earthquake. – ✅ True
(5) Unseasonal rains cause heavy damage to crops. – ✅ True
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: