#उत्तम
Автор: Amriita Shah
Загружено: 2021-12-29
Просмотров: 4315
Описание:
आकर्षणाचा सिद्धांत, नियम Law Of Attraction सांगतो :
तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट,घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीचं आकर्षित केलेली असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं.
आपल्या मनाच्या कपाटात जसे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनुन तुमच्या जीवनात समोर येते.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, श्यक्यतो सकाळी उठल्या नंतर, आणि रात्री झोपण्या पूर्वी, ठराविकचं स्थळी, शांतचित्ताने,प्राणायाम करुन किंवा ध्यान, मेडिटेशन करून, किंवा रिलॅक्स होऊन, चेहर्यावर समाधानाचे भाव ठेवुन, मनात, किंवा हलक्या आवाजात,ही वाक्ये पुर्ण संवेदना आणि भावनेसह, visualize करून, म्हणायची आहेत.
याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसुचना, Auto Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होवुन दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.
तुम्ही हे जर मनापासुन, विश्वासाने, श्रद्धेने, ध्रुड निष्यानें आणि तशाच संवेदना निर्माण करुन, त्यांची अनुभूती घेत, वारंवार बोललात आणि ऐकलात, तर ते तुमच्या सुप्तमनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचेल. तुमच्या नकळत ते तुमच्या सार्या आज्ञा पाळेल आणि सत्यात उतरवेल.
ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.
यात अट एकचं असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसुचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्या. इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसुचना बुमरॅग सारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.
आपणही आपल्या आयुष्यात ही शुभसुरुवात करावी.आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं, म्हणून हा विडिओ. Hypnotherapist, Numerologist, Counselor, Meditation & Law of Attraction coach अमृता शहा कडुन मन:पूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: