ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Baba Adhav Majha Katta : शोषित, कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांचा आठवणीतील 'कट्टा'

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-08

Просмотров: 7815

Описание: #abpmajha #babaadhav #majhakatta
सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे बाबा आढाव हे आधुनिक महाराष्ट्राच्या चळवळींच्या केंद्रस्थानी उभे राहिलेले एक लढवय्ये होते.
सत्यशोधक समाजवादी विचारांचे प्रखर प्रवर्तक आणि असंघटित मजुरांसाठी आयुष्य झोकून देणारे नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांचे 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एका पर्वाचा शेवट होय. हमाल, मजूर, तळागाळातील कष्टकरी, लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत (Hamal Panchayat), अंधश्रद्धाविरोधी लढा, ईव्हीएमविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन यासाठी त्यांना ओळखलं जातं. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष आणि परिवर्तन यांचा प्रवास होय.
बाबासाहेब पांडूरंग आढाव म्हणजे बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर, पण मनाने पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. ते लहान असताना त्यांचे मामा त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या बैठकींना घेऊन जात. राष्ट्र सेवा दल समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक रचनेत मूलगामी बदल घडविण्याची चळवळ राबवत होते. याच चळवळीने बाबा आढावांच्या विचारांची पायाभरणी केली.
1952 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. धान्याच्या किमती वाढत होत्या, शिधावाटप तुटपुंजे होते. त्याविरोधात बाबा आढावांनी सत्याग्रह केला. हा त्यांच्या सार्वजनिक संघर्षाचा पहिला निर्णायक टप्पा होता. याच काळात त्यांनी बाजारपेठेतील हमालांची दयनीय अवस्था जवळून पाहिली. दिवसभर जीव तोडून काम करणाऱ्या या मजुरांना किमान मजुरी, सुरक्षा, हक्क यापैकी काहीच मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी असंघटीत मजुरांसाठी काम करायचं ठरवलं.
कामगार, मजुरांच्या हक्कासाठी बाबा आढाव यांनी 1955 साली हमाल पंचायतीची स्थापना केली. हा असंघटित कामगारांना संघटित करण्याचा मोठा प्रयोग होता. त्या माध्यमातून मजुरांचे शोषण थांबवणे आणि त्यांना न्याय्य कामाचे वातावरण निर्माण करून देणे, समान संधी देणे हा उद्देश होता.

सन 1956 साली हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळाले आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली.

दोन दशकांच्या संघर्षानंतर 1969 साली राज्यात ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा’ लागू झाला. हा कायदा भारतातील असंघटित मजुरांसाठीचा पहिला संरक्षक कायदा ठरला. या कायद्यामुळे हमालांना सामाजिक सुरक्षा, नियमित मजुरी, कामगार हक्कांची कायदेशीर हमी, संघटनात्मक शक्ती उपलब्ध झाली.
हमाल पंचायत फक्त मजुरांसाठी लढली नाही, तर त्या माध्यमातून समूदाय विकासाचे मॉडेल उभे करण्यात आले. हमाल पंचायतीच्या माध्यमातून मोफत शाळा, दवाखाना आणि वैद्यकीय सुविधा, निवासी वसाहत, कुटुंबासाठी सहाय्य, आर्थिक सुरक्षा, आरोग्य योजना राबवण्यात आल्या.
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, 2 ऑक्टोबर 1974 रोजी बाबा आढाव यांनी ‘कष्टाची भाकर’ योजना सुरू केली. हमालांना स्वस्तामध्ये पौष्टीक अन्न देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. हमालांच्या कुटुंबांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणे, महागाईच्या काळात हमाल समूदायाला आधार देणे, श्रमिक कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणे अशी कामे त्या माध्यमातून करण्यात आली. ही योजना पुढे महाराष्ट्रातील श्रमिक कल्याण योजनांचे मॉडेल ठरली.
महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत बाबा आढाव यांनी 'एक गाव, एक पाणवठा' चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून दिला, सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला. ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी ही चळवळ महाराष्ट्रात अभूतपूर्व ठरली.

भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी बाबा आढाव यांनी केली. बाबा आढाव यांचा लढा हा पूर्णपणे अहिंसात्मक आणि जनआधारित होता.

बाबा आढाव हे फक्त एक नेते नव्हते तर ते स्वतः एक संपूर्ण संस्था होते. समानता, न्याय, आणि तळागाळातील माणसाचा सन्मान हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते . त्यांच्या निधनाने असंघटित मजूर, कष्टकरी, ग्रामीण वंचित आणि तर्कनिष्ठ चळवळींच्या पथदर्शकाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी पेटवलेला विचारांचा दिवा आणि समाजातील प्रत्येक दुर्बलासाठी आवाज उठवण्याची वृत्ती ही पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल हे नक्की.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Baba Adhav Majha Katta : शोषित, कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांचा आठवणीतील 'कट्टा'

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amruta Subhash Sandesh Kulkarni  ABP Majha Maha Katta : अमृता सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी

Amruta Subhash Sandesh Kulkarni ABP Majha Maha Katta : अमृता सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी

सत्यशोधक समाजवादी डॉ. बाबा आढाव यांचा जीवनपट | Baba Adhav | MaxMaharashtra

सत्यशोधक समाजवादी डॉ. बाबा आढाव यांचा जीवनपट | Baba Adhav | MaxMaharashtra

Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा

Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा

Dr Baba Adhav BBC Interview: सामाजिक कार्यकर्ते यांची मुलाखत | महाराष्ट्राची गोष्ट BBC News Marathi

Dr Baba Adhav BBC Interview: सामाजिक कार्यकर्ते यांची मुलाखत | महाराष्ट्राची गोष्ट BBC News Marathi

BABA ADHAV INTERVIEW| SPECIAL GUEST: कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांची विशेष मुलाखत

BABA ADHAV INTERVIEW| SPECIAL GUEST: कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांची विशेष मुलाखत

Nilesh Oak Majha Katta : रामायणातल्या आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी; संशोधक निलेश ओक 'माझा कट्टा'वर

Nilesh Oak Majha Katta : रामायणातल्या आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी; संशोधक निलेश ओक 'माझा कट्टा'वर

NCP Alliance news update live : कोणत्या अटीमुळे बोलणी फिस्कटली?| Ajit Pawar | Supriya Sule | Pune

NCP Alliance news update live : कोणत्या अटीमुळे बोलणी फिस्कटली?| Ajit Pawar | Supriya Sule | Pune

Swami Govind Dev Giriji Maharaj on Majha Katta : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज माझा कट्टा'वर

Swami Govind Dev Giriji Maharaj on Majha Katta : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज माझा कट्टा'वर

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

कुठल्याही धार्मिक विधीशिवाय बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार | Baba Adhav | Pune |  MaxMaharashtra

कुठल्याही धार्मिक विधीशिवाय बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार | Baba Adhav | Pune | MaxMaharashtra

Raj Thackeray आणि Uddhav ठाकरे यांच्या युतीवर Mumbai Muslim समाजाचे काय म्हणणं आहे ? | Maharashtra

Raj Thackeray आणि Uddhav ठाकरे यांच्या युतीवर Mumbai Muslim समाजाचे काय म्हणणं आहे ? | Maharashtra

Sharad Ponkshe Majha Katta | उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शरद पोंक्षे कोणत्या सेनेत, बेधडक माझा कट्टा

Sharad Ponkshe Majha Katta | उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शरद पोंक्षे कोणत्या सेनेत, बेधडक माझा कट्टा

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

Sudhir Mungantiwar Majha Katta : मंत्रिपद कुणामुळे गेलं? रोख कुणाकडे, सुधीर मुनगंटीवार  भरभरुन बोलले

Sudhir Mungantiwar Majha Katta : मंत्रिपद कुणामुळे गेलं? रोख कुणाकडे, सुधीर मुनगंटीवार भरभरुन बोलले

ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी Bala Nandgaonkar गैरहजर का राहिले.. मोठं कारण आले समोर.. | SP3

ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी Bala Nandgaonkar गैरहजर का राहिले.. मोठं कारण आले समोर.. | SP3

Eknath Shinde Speech | आपण ६२ पार केले, त्यांची आठाशीच गाठ,  शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं

Eknath Shinde Speech | आपण ६२ पार केले, त्यांची आठाशीच गाठ, शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं

Dilip Vengsarkar | Majha Maha Katta | माझा महाकट्टा | क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्याशी खास गप्पा

Dilip Vengsarkar | Majha Maha Katta | माझा महाकट्टा | क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्याशी खास गप्पा

मुंबईतले परप्रांतीय मतदार कुणाच्या पाठिशी? भायखळ्यातील लोक काय बोलले? Mumbai Ground Report | PS2

मुंबईतले परप्रांतीय मतदार कुणाच्या पाठिशी? भायखळ्यातील लोक काय बोलले? Mumbai Ground Report | PS2

संविधान निर्माण फक्त बाबासाहेबांमुळे || डॉ.विश्वंभर चौधरींचे भाषण गाजले #sanvidhan #nagpur

संविधान निर्माण फक्त बाबासाहेबांमुळे || डॉ.विश्वंभर चौधरींचे भाषण गाजले #sanvidhan #nagpur

Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका

Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]