केंद्रीय अर्थसंकल्प 2026 वर केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतिक्रिया | Budget Reactions | DD Sahyadri News
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-02-01
Просмотров: 575
Описание:
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर झाल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा अर्थसंकल्प शिक्षणापासून स्वयंरोजगारापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाचं सशक्त प्रतिबिंब असल्याचं म्हटलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 7 लाख 85 हजार कोटी रुपयांची तरतूद आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 साठी भक्कम पाया घालणारी असल्याचं सांगितलं.
नितीन गडकरी यांनी कनेक्टिव्हिटी, निर्मिती आणि प्रादेशिक संतुलनावर भर देण्यात आल्याचं स्पष्ट केलं. अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, आयटी आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेतून 20 लाख रोजगार संधी निर्माण होणार असल्याचं सांगितलं.
तसंच, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र टीका केली आहे.
#DDSahyadri #Budget2026 #ViksitBharat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: