ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Bara Abhang बारा अभंग

Автор: Shri S.S.Nagnath Alli Maharaj Sansthan,Solapur

Загружено: 2025-07-25

Просмотров: 36673

Описание: श्री स स नागनाथ अल्ली महाराज संस्थान, सोलापूर.

बारा अभंग Bara Abhang

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥

अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥
आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥
शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥

उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥
त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥
बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥ ४ ॥

जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥

ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥
आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥
करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
वर्णियेले एका गुणनामघोषं । जातील रे दोष तुका म्हणे ॥ ५॥

दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥
न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥
शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥

ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥
घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥

भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥

मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥
साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥

गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥

निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥

दुजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥
लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥
लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥
त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥
मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका महणे ॥५॥

सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पहा पदोपदी ॥१॥
पदोपदी पहा श्रीमुख चांगलं । प्रत्यक्ष पाऊली विठोबाची ॥२॥
विठोबाचे भेंटी हरेल बा चिंता । तुम्हालागी आता सांगितले ॥३॥
सांगितले खरे विश्वाचिया हीता । अभंग वाचिता जे का नर ॥४॥
ते नर पठणी जीवन्मुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ॥५॥

चार कोटी एक लक्षाचा शेवट । चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
सांगितले हे तुका कथुनियां गेला । बारा अभंगाला सोडू नका ॥२॥
सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाशकर्मे चुकतील ॥३॥
चुकती यातायाती विठोबाची आण । करा हें पठण जीवेभावे ॥४॥
जीवेभावें करितां होईल दर्शन । प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥

Shri S.S. Nagnath Alli Maharaj Sansthan, Solapur (श्री. स.स. नागनाथ अल्ली महाराज संस्थान, सोलापूर) reveals how Guru Krupa transforms life, thinking, karma and destiny.

✨ Through this episode devotees will understand:
✔ Power of surrender to Guru
✔ How Guru removes ignorance & fear
✔ The path from devotion to enlightenment
✔ Hidden secrets of spiritual success in modern life
Let this divine satsang bring peace, progress and prosperity to all.
📌 Connect with Us
🌐 Website: www.nagnathallimaharaj.com
📘 Facebook: facebook.com/JayBhauraya
🙏 Like, Share & Comment ‘Jay Bhauraya’ to receive divine blessings.
🛎 Subscribe to stay connected to upcoming spiritual discourses.

#baraabhang #tukaramaharaj #bhaktimarg #tukarammaharajbanjarabhajan #bhaktisadhana #nityapatachebaraabhang #santtukaramaharajabhang
#nagnathallimaharajmirvnuk
#GurubhaktiYog​ #GurubhaktiTelugu​ #JayBhauraya​ #NagnathAlliMaharaj​ #SpiritualSatsang​ #TeluguDevotional​ #BhaktiMarg​ #GuruKrupa​ #SanatanDharma​ #DivineWisdom​ #BhaktiSadhana​ #GuruDiscipleBond​ #SpiritualGrowth​ #TeluguSpiritualVideos​ #BhaktiPravachan

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Bara Abhang बारा अभंग

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bara Abhang 2020

Bara Abhang 2020

जीवन बदलून टाकणारे कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • ledies kirtan

जीवन बदलून टाकणारे कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • ledies kirtan

खिरोदा येथील हरिपाठातील काही क्षण  नक्कि पहा दि-16-12-2025

खिरोदा येथील हरिपाठातील काही क्षण नक्कि पहा दि-16-12-2025

Marathi Abhang | Sant Tukaram Maharaj | Pt. Sanjeev Abhyankar | Antarnaad Pratishthan

Marathi Abhang | Sant Tukaram Maharaj | Pt. Sanjeev Abhyankar | Antarnaad Pratishthan

नित्यनैमित्तिक सांप्रदायिक बारा अभंग (Bara abhang)

नित्यनैमित्तिक सांप्रदायिक बारा अभंग (Bara abhang)

Одна привычка с водой, которая ломает поджелудочную после 50

Одна привычка с водой, которая ломает поджелудочную после 50

श्रीकृष्ण लीलालु भाग-१

श्रीकृष्ण लीलालु भाग-१

मंत्रमुग्ध व्हाल असे कीर्तन ! बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे बीड येथील संपूर्ण  कीर्तन ! Vasant Gadkar

मंत्रमुग्ध व्हाल असे कीर्तन ! बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे बीड येथील संपूर्ण कीर्तन ! Vasant Gadkar

संध्याकाळचे भजन Bhajan Nityaniyamavali| Sandhyakalache Bhajan|

संध्याकाळचे भजन Bhajan Nityaniyamavali| Sandhyakalache Bhajan|

इंचगिरी रसाळ सांप्रदाय, श्री क्षेत्र संतभूमी  कृत सांप्रदायिक सकाळचे भजन | Sakalche Bhajan | Abhang

इंचगिरी रसाळ सांप्रदाय, श्री क्षेत्र संतभूमी कृत सांप्रदायिक सकाळचे भजन | Sakalche Bhajan | Abhang

Не ходи домой, тётенька там беда,  прошептала цыганка. Через минуту из подъезда вышел мой муж с ...

Не ходи домой, тётенька там беда, прошептала цыганка. Через минуту из подъезда вышел мой муж с ...

श्रीकृष्ण तत्व परब्रह्म तत्व भाग-१

श्रीकृष्ण तत्व परब्रह्म तत्व भाग-१

Bara abhang sant tukaram

Bara abhang sant tukaram

||आजची श्रीविठ्ठल महापूजा व आरती पंढरपूर✨️🪔🪷🙏||Pandharpur shree vitthal Mahapuja

||आजची श्रीविठ्ठल महापूजा व आरती पंढरपूर✨️🪔🪷🙏||Pandharpur shree vitthal Mahapuja

JANMACHE TE MUL PAHILE SHODHUN ||जन्माचे ते मूळ पाहिले शोधून ॥

JANMACHE TE MUL PAHILE SHODHUN ||जन्माचे ते मूळ पाहिले शोधून ॥

ПОЧЕМУ Об Этом МОЛЧАТ! Вот Что ТВОРИТ ХУРМА с организмом....

ПОЧЕМУ Об Этом МОЛЧАТ! Вот Что ТВОРИТ ХУРМА с организмом....

इंचगिरी रसाळ संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट कृत श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा नित्यपाठ #Santbhumi

इंचगिरी रसाळ संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट कृत श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा नित्यपाठ #Santbhumi

#इंचगिरी_संप्रदाय_नित्या_उपासना_रात्रीचे_भजन_DSSM#viralvideo #बाराअभंग #mauli#DSSM#Nandeshwar

#इंचगिरी_संप्रदाय_नित्या_उपासना_रात्रीचे_भजन_DSSM#viralvideo #बाराअभंग #mauli#DSSM#Nandeshwar

दैनंदिन हरिपाठ | वारकऱ्यांचा नित्यक्रम

दैनंदिन हरिपाठ | वारकऱ्यांचा नित्यक्रम

अभंग - सत्य ज्योतिर्लिंग बारा

अभंग - सत्य ज्योतिर्लिंग बारा

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]