100 शेळी पालनसाठी अनुदान मिळणार...!👇👇
Автор: News98 Mahakesari / न्यूज98 महाकेसरी
Загружено: 2025-08-01
Просмотров: 270990
Описание:
NLM Sheli Palan शेतीबरोबरच आता ग्रामीण भागात शेळीपालन एक नफा कमावणारा पर्याय ठरत आहे. कमी खर्चात सुरू करता येणाऱ्या या व्यवसायातून दूध, मांस आणि लोकर यासारख्या उत्पादनांची चांगली मागणी असते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन मिशन (National Livestock Mission NLM) योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी मोठी आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे, या योजनेद्वारे तुम्हाला 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 7.5 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते.राष्ट्रीय पशुधन मिशन ही केंद्र सरकारची योजना असून, 2014-15 पासून सुरू आहे. 2021-22 मध्ये यामध्ये सुधारणा करून ती अधिक प्रभावी करण्यात आली. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना शेळी, मेंढी, डुक्कर आणि कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायासाठी आर्थिक मदत देऊन उद्योजक बनवणे.
या योजनेद्वारे पशुपालनासाठी कर्ज घेता येते आणि त्यावर 50% पर्यंत अनुदान (Subsidy) दिलं जातं. उदाहरणार्थ, 100 शेळ्या आणि 5 बोकडांच्या युनिटसाठी साधारण 15 लाखांचा खर्च येतो, ज्यावर 7.5 लाख रुपये सबसिडी मिळते.
या सबसिडीचा उपयोग प्रामुख्याने शेळ्या खरेदी, शेड बांधणी, चारा उत्पादन, विमा आणि उपकरणांसाठी होतो. मात्र, जमीन खरेदी, घरभाडे किंवा खासगी वाहनासाठी योजनेअंतर्गत अनुदान दिलं जात नाही.
कोण करू शकतो अर्ज?
व्यक्ती, स्वयंसहायता गट (SHG), शेतकरी उत्पादक संस्था (FPO), सहकारी संस्था किंवा संयुक्त दायित्व गट (JLG) यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
अर्जदाराकडे शेळीपालनाचं प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावं लागतं किंवा स्वनिधीतून प्रकल्प उभा करावा लागतो.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.nlm.udyamimitra.in वर जावं लागेल.
प्रथम मोबाइल क्रमांकाच्या साहाय्याने नोंदणी करावी लागते.
त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत.
लागणारी कागदपत्रं:
आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC डॉक्युमेंट्स
बँकेचं लोन मंजुरीपत्र (Loan Sanction Letter)
शेळीपालन प्रोजेक्टचा रिपोर्ट
प्रशिक्षण प्रमाणपत्र (जर असेल तर)
जमिनीचे दस्तऐवज (मालकी किंवा भाडेपट्टा)
अर्ज सादर केल्यानंतर तो राज्यस्तरीय कार्यकारी समितीकडून (SLEC) तपासला जातो. मंजुरी मिळाल्यावर सबसिडीची रक्कम दोन टप्प्यांत खात्यावर जमा केली जाते.
शेळीपालन सुरू करताना लक्षात ठेवाव्या गोष्टी
शेळीपालन फायदेशीर ठरण्यासाठी योग्य जातींची निवड, हवेशीर शेड, पोषणयुक्त चारा आणि आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. स्थानिक पशुवैद्यकांचा सल्ला, नियमित लसीकरण आणि बाजारातील मागणीचा अभ्यास केल्यास यशस्वी व्यवसाय शक्य आहे.
NLM योजनेतून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन देखील मिळतं. यामुळे शेतीपेक्षा वेगळा आणि स्थिर उत्पन्नाचा व्यवसाय हाती घेण्यास मदत होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: