Camp Dapoli History | कॅम्प दापोलीची गोष्ट | Taluka Dapoli
Автор: Taluka Dapoli
Загружено: 2018-01-08
Просмотров: 33035
Описание:
१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षिदार राहिली. १६११ … पण कॅम्प दापोलीची ही गोष्ट १६११ मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळ बंदरात कोकणातला पहिला कारखाना टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरु होते. फेब्रुवारी १६११ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सर हेन्री मिडलटन ने ३ बोटींसह दाभोळ बंदरात तेव्हाच्या सिद्धी गव्हर्नरची भेट घेतली व थोडासा व्यापारही मिळवला. असा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीने पुन्हा १६१२ आणि १६१८ मध्ये पुन्हा केला पण दाभोळ आणि एकंदरीत कोकण किनाऱ्यांवर असलेल्या पोर्तुगीज आणि डच प्रभुत्वामुळे तोही अयशस्वी ठरला. शेवटी १६२४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला, सिद्धी बरोबर झालेल्या करारानुसार दाभोळ बंदरात कारखाना उघडण्यासाठी परवानगी मिळाली. दाभोळ बंदर व आसपासचा प्रांत, कंपनीच्या व्यापाराकरिता अधिक सुरक्षित आणि सोईस्कर ठरेल, म्हणून कंपनीने त्यांचे सुरतेचे सर्व कारखाने व धंधे दाभोळला हलवावे, अशी अट १६२४ च्या ह्या करारात होती. कारखाना चालू केल्यानंतर मात्र इंग्रज ह्या कराराला प्रामाणिक राहिले नाहीत आणि पुढील दहा वर्षातच त्यांना दाभोळचा कारभार आटोपता घ्यावा लागला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोकणात तळ जमविण्याचा हा पहिला प्रयत्न होता. १६३९… कोकणात त्यानंतर १६३९ मध्ये सर विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने कारखाना टाकण्यात यश मिळवले. लंडनच्या ह्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने दाभोळ आणि राजापूर प्रांतातून जवळजवळ दहा वर्षे व्यापार चालवला. राजापूर आणि दाभोळ ह्या दोन व्यापारी बंदरातून इंग्रज वर्षाला जवळजवळ ३००० खंडी मिरीची निर्यात करीत. मिरपुडीचा वापर हा मांस जास्त काळ टिकवण्यासाठी होत असे. युरोपातल्या “मीट प्रोसससिंग” इंडस्ट्रीचा हा सुरवातीचा काळ होता. विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन बरोबर ईस्ट इंडिया कंपनीसाठीहि राजापूर हे सुरत व बॉम्बे नंतरचे महत्वाचे लक्ष्य बनले होते.....
Want to read more? visit our website!
To watch more researched videos about Dapoli, subscribe to Taluka Dapoli now!
Visit our Website: www.talukadapoli.com OR www.talukadapoli.com/travel
Like Us On Facebook: / talukadapoli
Follow Us On Instagram: / talukadapoliofficial
Follow Us On Twitter: / talukadapoli
For Writers: [email protected]
For Editors: [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: