संताजी घोरपडेंनी राजाराम महाराजास पराभूत करून बंदी बनवले || Santaji Ghorpade VS Rajaram Maharaj ||
Автор: Patil's Opinion
Загружено: 2025-06-17
Просмотров: 3894
Описание:
#patilsopinion
#shivajimaharajhistroy
संताजी घोरपडेंनी राजाराम महाराजास पराभूत करून बंदी बनवले || Santaji Ghorpade VS Rajaram Maharaj ||
• संताजी घोरपडेंनी राजाराम महाराजास पराभूत क...
या व्हिडिओमध्ये संताजी घोरपडे विरुद्ध धनाजीजाधव व राजाराम महाराज यांची झालेली आयवारकूटीच्या लढाईचे वर्णन केलेलं आहे.
In this video describes the battle of Ivarkuti against Santaji Ghorpade against Dhanaji jadhav and Rajaram Maharaj.
जय शिवराय...
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची घडी संपूर्णपणे विस्कळीत झाली होती. महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना औरंगजेबाने कैद केले होते.
स्वराज्याचा छत्रपती राजाराम महाराज यांचा जीव वाचला पाहिजे म्हणून येसूबाईंनी त्यांना जिंजीच्या किल्ल्यावर पाठवले. मराठ्यांची राजधानी असलेला रायगड किल्ला जुल्फीकारखानाने औरंगजेबाच्या ताब्यात दिला. म्हणजे स्वराज्याचा कर्तबगार छत्रपती मरण पावला, त्यांच्या जागी नेमलेला छत्रपती जिंजीकडे पळून गेला, स्वराज्याची महाराणी आणि राजपुत्र कैद झाले, स्वराज्याची राजधानी सुद्धा शत्रूकडे गेली.
अशा अतिबिकट प्रसंगी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी स्वराज्याचे संरक्षण केलं. केवळ संरक्षणच नव्हे तर दख्खनेत असलेल्या औरंगजेबाच्या सैनिकाला सडो की पळो करून सोडले. संताजी - धनाजीची औरंगजेबाला त्याच्या सरदाराला,सैनिकाला भयंकर धास्ती होती. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर स्वराज्याचे संरक्षण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी केले असं म्हणायला काही हरकत नाही.
औरंगजेबाकडून रायगड सुद्धा जिंकून घेतला.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे मराठे मुघलांना जाऊन मिळाले होते ते मराठे परत स्वराज्यामध्ये येऊ लागले. छत्रपती राजाराम महाराज यांचे स्वागतच करू लागले. अशातलाच एक मराठासरदार म्हणजे नागोजी माने..हा नागोजी माने पूर्वी विजापूर मध्ये सरदार म्हणून होता, त्यानंतर तो मोगलाई मध्ये सरदार बनला, मराठ्यांच्या पडत्या काळामध्ये तो मराठ्यांच्या विरोधात लढला. पण संताजी घोरपडे नी स्वराज्य सावरलं,नव्हे तर स्वराज्याची ताकद दुप्पट बनवली. तेव्हा हा नागोजी माने स्वराज्यामध्ये येऊन दाखल झाला. अशा संधीसाधू गद्दार नागोजी मानेला राजाराम महाराजांनी सरदार म्हणून नेमलं या गोष्टीचा राग संताजी घोरपडे यांना आला होता.
नागोजी मानेचा मेहुना अमृतराव निंबाळकर.. हा नागोजी माने पेक्षाही गद्दार होता. हा आपल्या स्वार्थासाठी काही दिवस मोगलाई मध्ये राहायचा तर काही दिवस मराठी शाळेमध्ये राहायचा. राजाराम महाराजांनी याला सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतले. या गोष्टीचे संताजी घोरपडेना वाईट वाटायचे. संताजी घोरपडे यांचा स्वभाव स्पष्ट असल्यामुळे तो राजाराम महाराजांच्या समोर तडकफळक बोलायचा.अशा बोलल्यामुळे राजाराम महाराजांचे मन दुखावले गेले. स्वराज्यातील मंत्री कारभारी सुद्धा संताजी घोरपडे यांच्या विरोधात झाले.राजाराम महाराजांच्या दरबारात जिंजीच्या दरबारात विदुष्ट येताच संताजी आपल्या फौजेसह बाहेर पडला. आपल्या सह 25 हजाराची फौज घेऊन तो स्वराज्यापासून वेगळा झाला. तरीही स्वराज्यवरची त्यांची निष्ठा कमी झाली नव्हती. स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा तो निपात करत होता. मंत्र्यांच्या गटकारस्थानामुळे राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे यांच्या मधलं वितृष्ठ वाढतच गेलं वाद वाढतच गेला.
संतांची घोरपडे हा स्वतःला राजा बनवून संपूर्ण मराठीशाही आपल्या ताब्यात घ्यायच्या विचारात आहे. अशी भीती कारभारी मंत्रांनी व धनाजी जाधव यांनी राजाराम महाराजांच्या मनात घातली.
संताजी ला धडा शिकवायला हवा यासाठी धनाजी जाधव,नागोजी माने व खुर्द राजाराम महाराज संताजींच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपली फौज घेऊन आयवारकुटीला आले.
संताजी घोरपडे यांची राजाराम महाराजांच्या विरोधात लढण्याची इच्छा नसताना सुद्धा नाईलाजानी त्या ठिकाणी भयंकर युद्ध झाले.
परिणामतः संताजी घोरपडेंकडून राजाराम महाराजांचा पराभव झाला. ही जगप्रसिद्ध आयवरकूटीची लढाई कशी घडली याविषयीचे सविस्तर वर्णन प्रस्तुत व्हिडिओमध्ये केलेले आहे.
संदर्भ ग्रंथ - संताजी घोरपडे [ जफतन मुलुख ]
लेखक - रवी शिवाजी मोरे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: