गाऊट हा आजार कश्यामुळे होतो? | What is Gout? | -Dr Prakash Patil
Автор: Sahyadri Hospitals -Marathi | सह्याद्रि हॉस्पिटल्स
Загружено: 2023-07-06
Просмотров: 5206
Описание:
आजच्या विडियो मध्ये Dr. Prakash Patil आपल्याला गाउट हा साध्यांना होणारा आजार कश्यामुळे होतो हे सांगणार आहे.
00:00 Introduction
00:25 गाऊट म्हणजे काय?
काही लोंकाच्या रक्तात यूरिक ॲसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे वेदनाकारक संधिवात होतो त्यालाच गाऊट म्हणतात . याची लक्षणे म्हणजे वारंवार हाडाच्या सांध्यामध्ये वेदना, सुज, लालसरपणा जे अचानक आणि रात्रीतून वाढते. हाडांच्या सांध्यामध्ये यूरिक ॲसिड जमा झाल्यामुळे, सूई सारखे खडे बनतात त्यामुळे अचानक वेदना होतात.
01:21 गाऊट होण्याचे मुख्य कारणं :
रक्तामध्ये यूरिक ॲसिड च्या जमा होण्याने सांध्यामध्ये युरेट चे खडे बनतात.
अनुवांशिक आणि पर्यावरणाच्या घटक यांच्या एकत्रीकरणाने.
जेवणात प्युरीन युक्त पदार्थ समावेश केल्याने.
लठ्ठपणा.
अतिप्रमाणात मद्यपान.
02:04 गाऊटची लक्षणं :
1. साधारण याचा परिणाम पायाच्या अंगठ्याच्या सांध्यावर होतो.
2. सांध्याला (विशेषत: गुडघा, पायाची बोटं, हाताचं ढोपर आणि बोटं) यात तीव्र आणि अचानक वेदना)
3. प्रभावित जागेची त्वचा लाल गरम होऊन सूजते.
4. ताप आणि थंडी
02:41 गाऊटवरील उपाय:
गाऊटमध्ये युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवणारा आहार घेतला पाहिजे. यासाठी अधिक Potassium युक्त आहार घ्या. जसे केळी इत्यादि. अधिक Complex Protein युक्त आहार घ्या. जसे जांभूळ, ओवा इ. मद्यपान, धुम्रपान, तंबाखूचे व्यसन करणे टाळा.
Purine युक्त आहार घेऊ नये. जसे मांसाहार, झींगा, कोबी, पालक, मटार, शीतपेये इ. आहार घेणे टाळा.
आहारात मिठाचा अत्यंत कमी वापर करा.
हिरव्या पालेभाज्या, फळे, लसूण, आले यांचा आहारात भरपूर समावेश करा.
दररोज पुरेसे म्हणजे साधारण आठ ग्लास पाणी प्यावे. लघवीस वेळच्यावेळी जावे. लघवीस होऊनही थांबवून ठेऊ नये.
गाऊट हा एक प्रचंड पीड़ादायी असा आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणे जाणवू लागताचं योग्य उपचार करून घ्यावे लागतात
अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही या विषयासंदर्भात काही अडचण असल्यास कमेंट बॉक्स मधे कमेंट करा.
धन्यवाद.
-----------------------------------------------------------------
About Sahyadri Hospitals Ltd.:
Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr. Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.
The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.
#jointpain #uricacid #gout #goutproblem #uricacidproblem #sahyadrihospitals #drprakashpatil #arthritis
Thanks!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: