Mahimatgad | महिमतगड |
Автор: Trek-Diary Marathi Vlog
Загружено: 2022-07-30
Просмотров: 1561
Описание:
महिमतगड,
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हा किल्ला आहे. देवरुख गावातून बेलारी फाटा मार्गे निरगुडवाडीच्या पुढे गडाच्या पायथ्यापर्यत म्हणा ना, गाडी रस्ता झालेला आहे. तेथून पुढे पायवाटेने किल्ला उजवीकडे ठेवत वळसा घालून गडावर जाता येते. उजव्या बाजूला वर महिमतगडाची तटबंदी दिसते. पश्चिमेकडील खिंडीपर्यंत पोहोचल्यावर खिंडीच्या पलीकडे कुंडी गावातून येणारा मातीचा रस्ता दिसतो. या खिंडीपर्यंत आता गाडी रस्ता झालेला आहे. पायवाटेने गडाच्या महादरवाज्या पर्यंत पोहोचता येते. किल्ल्यावर कातळामध्ये पाण्याची तीन टाकी खोदलेली आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा दिसतो. या दरवाजाची कमान मात्र शिल्लक नाही. पण दरवाजाची कमान पेलणारे खांब आजही तेथे दरवाजा असल्याच्या खुणा दर्शवितात. वाटेवर डावीकडे एक बांधीव तलाव आहे. उत्तरेकडील तटाजवळ महिषासुरमर्दिनीचे मंदिर आहे.
या किल्ल्यासंबंधी विश्वसनीय ऐतिहासिक नोंद अद्यापि मिळालेली नाही. विविध मंदिरे इ. वास्तू व दरवाजाची बांधणी पाहता हा किल्ला आदिलशाही किंवा निजामशाही कालखंडात बांधलेला नसावा. गडावरील स्थापत्यशास्त्रीय पुरावे पाहता किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या काळात बांधला असावा. पुढे हा किल्ला सातारच्या छ. शाहूंकडे किंवा ताराबाईंकडे असण्याची शक्यता जास्त आहे.
संदर्भ :
गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले भाग -२, पुणे, १९०५.
जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्गवैभव, पुणे, २०१३.
#trekking #mountains #adventure #camping #naturelovers #trek #forest #trekkinglovers #Mahimatgad #महिमतगड #konkan #किल्ला
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: