🔴 LIVE : ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा २०२५ आळंदी येथून थेट प्रसारण ! Mauli Prasthan Alandi
Автор: Marathi Kirtankar
Загружено: 2025-06-19
Просмотров: 77632
Описание:
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. गुरुवारी माउलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असून, पहिला मुक्काम आळंदी गांधीवाडा येथे होईल. राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. संपूर्ण तीर्थक्षेत्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.
आळंदीला जोडणारे पुणे, मरकळ, चाकण, वडगाव या रस्त्यांवर वारकऱ्यांच्या दिंड्यांचा अखंड प्रवाह सुरू आहे. खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेले वारकरी महिला-पुरुष भक्तीच्या रंगात रंगून आळंदीत पोहोचत आहेत.इंद्रायणी घाटही भाविकांनी फुलला आहे. माउलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून भक्त दर्शनाचा लाभ घेत आहेत. सर्वत्र भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे स्वर घुमत असून, रस्ते आणि परिसर वारकऱ्यांनी फुलले आहेत.माऊलींची पालखी ज्या रथातून प्रवास करते, तो रथ पूर्णपणे सज्ज झाला आहे. रथाची रंगरंगोटी, वीज, पॉलिश, डागडुजी, ट्रायल यांसह सर्व दुरुस्तीची कामे संस्थानने पूर्ण केली आहेत. पालखी सोहळ्यासाठी लागणारे सर्व साहित्यही जुळवाजुळव करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी वडगाव चौक, माउली मंदिर, चाकण चौक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून, येथे मोफत औषधोपचार दिले जात आहेत. सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: