फक्त 4 घटकांत गणपती नैवेद्यासाठी नारळ बर्फी | 4 Ingredients Desiccated Coconut Barfi
Автор: Manavi's kitchen
Загружено: 2025-08-20
Просмотров: 1119
Описание:
गणपतीच्या नैवेद्यासाठी डेसिकेटेड कोकोनट बर्फी । Desiccated coconut barfi recipe
Desiccated Coconut Barfi ही रेसिपी सणासाठी कमी साहित्यात पटकन बनणारी रेसिपी आहे.
साहित्य:
डेसिकेटेड कोकोनट – २ ते १/२ कप
साखर – १ वाटी
दूध – २ कप
वेलदोड्याची पूड – १ चमचा
तूप – १ चमचा
खवा – १०० ग्रॅम
केशर - ७-८ काड्या
सिल्वर पेपर- (ऐच्छिक)
कृती:
सुरवातीला गॅस वरती पॅन ठेऊन मंद आचेवरती हा कोकोनट हलकासा २-३ मिनिटे भाजून घ्या. भाजल्यावर एका ताटा मध्ये काढून घ्या.
त्याचं पॅन मध्ये दूध,साखर,केशर घालून चांगले मिक्स करा आणि वरून वेलदोडे पूड घाला.
नंतर खवा टाकून दुधामध्ये चांगल मिक्स करून घ्या.
मिक्स झालेल्या सारणामध्ये कोकोनट टाकून घ्या.
आता हे मिश्रण २-३ मिनिटे मिक्स करून घ्या. सारण पॅनला चिटकू नये याची काळजी घ्या.
सारण तयार झाले की एका ताटाला तूप लावून घ्या. त्यामध्ये सारण एकसारक लावून घ्या.
आता हे सारण तुम्ही फ्रिज मध्ये किंवा रूम टेंप्रेचरवर सुद्धा सेट करू शकता.
आता सारण सेट झाल्यावर त्याच्या सिल्वर पेपर लावून वड्या पाडून घ्या.
खोबऱ्याची बर्फी तयार!
ही बर्फी सण-वार गणपती उत्सव, दसरा किंवा दिवाळीला खास बनवा आणि घरच्या घरी गोड चविष्ट आनंद घ्या.
टीप:
जास्त वेळ शिजवल्यास बर्फी कोरडी होऊ शकते.
हेच मिश्रण एका वाटीत भरून "नारळाचा लाडू" देखील बनवता येतो.
Ukadiche Modak Recipe in Marathi | गव्हाच्या पिठाचे सोपे व मऊसुत मोदक
रेसिपी- :// • Ukadiche Modak Recipe in Marathi | गव्हाच्...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#ganpatibappa #ganeshfestival #गणपती #ganpatispecial #नारळवाडी #desiccataedcoconutbarfi #coconut #coconutrecipes #cooking #food #festival #marathi #gavran #manavi’skitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: