श्रीरामपूर :- महिला शिक्षकाला प्राचार्याकडून मानसिक छळ गुन्हा दाखल..!
Автор: AAVAJ JANATECHA NEWS
Загружено: 2026-02-13
Просмотров: 9133
Описание:
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरातील प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे महिला शिक्षकांवर कामाच्या ठिकाणी अन्याय व मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना सायंकाळी साडेपाचपर्यंत कार्यालयात थांबण्याचे बंधन घालण्यात आले असून, हरकत घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांवर जबरदस्तीने सही घेणे व राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच प्राचार्य अभिषेक कुमार सेन यांनी अपमानास्पद व धार्मिक स्वरूपाची वक्तव्ये केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ मगर यांनी व्यवस्थापनाला दोन दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. व्यवस्थापनाकडून निलंबनाचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली आहे, तसेच प्रशासनाकडून पुढे काय पावले उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔥
#Shrirampur
#Ashoknagar
#CollegeControversy
#WomenSafety
#MentalHarassment
#JusticeForTeacher
#EducationNews
#MaharashtraNews
#BreakingNews
#AndolanWarning
#CollegeIssue
#LocalNews
#MarathiNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: