रायगड प्रदक्षिणा/परिक्रमा | Raigad Pradakshina | Around the Base of Raigad | The Mountaineer
Автор: THE MOUNTAINEER
Загружено: 2024-03-18
Просмотров: 546
Описание:
रायगड प्रदक्षिणा/परिक्रमा | Raigad Pradakshina | Around the Base of Raigad |
सभासद बखर म्हणते -
राजा खासा जाऊन पाहता गड़ बहुत
चखोटा.
चौतर्फा गड़ाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव
उंच. पर्जन्यकाळी कड़ियावर गवत उगवत नाही
आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद
पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने
थोडका. दौलताबादचे दशगुणी गड़ उंच असे
देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास
जागा हाच गड़ करावा.
99
याच दुर्गद्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.:-
१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबूद्वीप ६.तणस
७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी
१३.शिवलंका १४. राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या
पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७००
फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक
खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान
आणि महत्त्व पाह्न १६ व्यां शतकात याला आपल्या राज्यारची
राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला.
इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.
सदर किल्ला हा महाराष्ट्रशासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित
स्मारक अहे.
ह्याचे प्राचीन नाव 'रायरी' हे होते. युरोपचे लोक त्यास 'पूर्वेकडील
जिब्राल्टर' असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य
तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे
स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास 'रासिवटा'
व 'तणस' अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व
सभोवतालच्या दच्या यावरून त्यास 'नंदादीप' असेही नाव पडले.
निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.
मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर
जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी
६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढ़ा घातला व
में महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना,
कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे
निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून
रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गड़ाच्या
बांधकामासाठी केला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: