नागपूर कंपनीतील स्फोटात 19 जणांनी जीव गमावला, कुटुंबांचा आक्रोश Ground Report
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-03
Просмотров: 16044
Описание:
नागपूर जवळच्या राऊळगाव इथे एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत 1 मार्चला झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला, तर 23 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे. या महिलांपैकी अनेकांच्या मागे लहान मुलं आहेत.
21 वर्षांची गुंजन पाचभाई आपल्या आईला गमावल्यानंतर आता घराची जबाबदारी सांभाळतेय. मेटपांजरा, ढवळापूरसारख्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. जुळ्या मुलांची आई वर्षा टेकाम, दहावीत शिकणाऱ्या अनितची आई प्रतिभा वल्के अशा अनेक कुटुंबांचा आधार एका क्षणात हरपला.
दरमहा 10 ते 12 हजार रुपयांसाठी जीव धोक्यात घालणारे हे कामगार आहेत.
गेल्या दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात सहा स्फोटक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही सुरक्षेचे नियम का पाळले जात नाहीत? असा प्रश्न विचारला जातोय
या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- शरद बढे
#RavalgaonBlast #NagpurBlast #NagpurExplosion #NagpurNews #Groundreport #BBCMara
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: