#उपवासाचे
Автор: Swad Gharcha
Загружено: 2026-02-25
Просмотров: 19
Описание:
उपवासाचे आलू क्रिस्पी
प्रस्तावना:: उपवासाला नवनवीन पदार्थाची उत्सुकता प्रत्येकाला असते.. त्यासाठी असा एक नवीन पदार्थावर जो सगळ्यांना आवडेल... बटाट्याचे पदार्थ सर्वांनाच आवडतात.... म्हणूनच आपणास बनवणार आहे उपवासाचे आलू क्रिस्पी
साहित्य:: तीन बटाटे एक चमचा जिरे अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा तिखट तळण्यासाठी तेल मीठ चवीप्रमाणे
कृती:: बटाटे स्वच्छ धुऊन घ्या बटाट्याची साल काढून घ्या... आणि बटाट्याच्या किसणीच्या साह्याने त्याचा लांब लांब असा कीस पाडून घ्या... किस पडल्यानंतर दोन ते तीन पाण्याने हा की स्वच्छ धुऊन घ्या.. म्हणजे बटाट्यामधील स्टार्च निघून जाईल. आणि बटाटा दाबून दाबून त्यातील पाणी संपूर्ण काढून घ्या... पाणी संपूर्ण निघाल्यानंतर रुमालाने तुम्ही ते कोरडे करू शकतात किंवा पाणी संपूर्ण निघाले असेल तर रुमाला फोडी करण्याची गरज नाही... गरम तव्यावर चांगले शेंगदाणे खरपूस भाजून घ्या... मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे कूट एकदम बारीक करा... कारण आपण ही शेंगदाण्याची कूट बाइंडिंग साठी वापरणार आहे.. म्हणून ते एकदम बारीकच हवे..आता हा किस एका बाऊलमध्ये घाला त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक असे कूट घाला एक चमचा तिखट घाला. एक चमचा जिरे घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला आणि सर्व मिश्रणाचा गोळा तयार करा... आता कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घाला.. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर छोटे छोटे बॉल्स करून किंवा गोळे करून ते तळायला घाला... आपले बटाट्याचे क्रिस्पी तेलात सोडा... एका बाजूने खरपूस तळल्यानंतर त्याची बाजू पलटी करा आणि दुसऱ्या बाजूनेही तांबूस रंग येईपर्यंत क्रिस्पी तळून घ्या... खमंग असे गोळे तयार होतील... त्यासोबत जाड मिरची फ्राय करून घ्या आणि त्यावर मीठ घाला... आता आपली क्रिस्पी तेलामधून काढून घ्या... आणि एका प्लेटमध्ये काढा... आपली उपासाची खमंग अशी आलू क्रिस्पी आता तयार झालेली आहे.... ही क्रिस्पी लहान मुलांना तर अत्यंत आवडते चला तर मग एन्जॉय करूया खमंग अशी आलू क्रिस्पी....
टिप्स::: बटाट्याच्या किसामध्ये पाणी वाटत असल्यास एक रुमाल घेऊन त्यावर बटाट्याचा कीस पसरावा आणि त्याच रुमाल्याने तो दाबून दाबून त्यातील पाणी काढून घ्या. म्हणजे आपली बटाटा क्रिस्पी जास्त तळकट होणार नाही...
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे
परिमाण:२ जणांसाठी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: