Masala Bhaat | मसाला भात | Trupti Food Studio
Автор: Trupti Food Studio
Загружено: 2026-02-13
Просмотров: 19
Описание:
Masala Bhaat | मसाला भात | Trupti Food Studio
मस्कार तुमचे स्वागत आहे Trupti Food Studio आज आपण स्वादिष्ट झटपट मसाला भात ही रेसिपी बनवणार आहे चला तर मग सुरू करू.
साहित्य
तांदूळ
गाजर
फ्लॉवर
पावटा
बिन्स
वाटाणा
बटाटा
टोमेटो
कांदा
2 पाने तेज पत्ता
4 लवंग
3 काळी मिरी
1 दालचिनीचा तुकडा
कडीपत्ता
1 चमचा जीरे
1 चमचा मीठ
1 चमचा हळद
2 चमचा कांदा मसाला
1 चमचा लाल तिखट
2 चमचे धने पाउडर
प्रकृती
सर्वात आधी भाज्या कापून घेऊ तर लागणाऱ्या भाज्या गाजर, फ्लॉवर, पावटा, बिन्स, वाटाणा, आणि बटाटा ह्या सर्व भाज्या कापून घेतल्या नंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. नंतर 2 वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 1 टोमेटो आणि 1 कांदा बारीक कापून घेणे.
आता गैस वर कुकर ठेवून त्यात थोडे तेल टाकावे आणि 2 पाने तेज पत्ता , 4 लवंग, 3 काळी मिरी व 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेणे व त्याला चांगले परतावे नंतर त्यात कडीपत्ता 1 चमचा जीरे कापलेला कांदा आणि बारीक कापलेला टोमेटो टाकून परतून घ्यायचा. व तो परतून झाला की त्यात 1 चमचा मीठ 1 चमचा हळद 2 चमचा कांदा मसाला 1 चमचा लाल तिखट 2 चमचे धने पाउडर टाकून त्याला चांगले मिक्स करावे. नंतर कापलेल्या भाज्या टाकून चांगले मिक्स करावे व त्यात थोडे पाणी टाकावे. नंतर त्यात धुतलेले तांदूळ टाकावे व चांगले मिक्स करावे नंतर थोडे पाणी टाकून मिक्स करून झाकण ठेवून 4 ते 5 कुकरच्या शिट्या होई पर्यंत शिजवून घेणे. अश्या प्रकारे आपला मसाला भात रेसिपी तयार झाली आहे.
“ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! "
व्हिडिओ ला like, share आणि आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा खाली. comment box मधे आपली प्रतिक्रिया कळवा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: