De Manacha Rita Kopara | दे मनाचा रिता कोपरा ... | Marathi Ghazal |
Автор: Gazal Nawaz Bhimrao Panchale
Загружено: 2021-07-02
Просмотров: 54642
Описание:
दे मनाचा रिता कोपरा...
मित्रांनो ... अपार स्नेह !
माझ्या एकेका गज़लच्या सांगीतिक स्वरूपाची एकेक कथाच आहे बघा !
हार्मोनियम घेऊन निवांत गज़ल स्वरबद्ध करायला बसलो असे क्वचितच घडले असेल .
सर्वार्थाने आवडलेली गज़ल स्वरांत बांधायची ,असे मनाने घेतले की मग ती रचना तनामनावर स्वार होऊन बसते आणि स्वरबद्ध झाल्यावरच पायउतार होते .
मज नको हे गगन ही धरा
दे मनाचा रिता कोपरा ...
आजच्या या नितीन भट च्या गज़लबाबतीत सुद्धा असेच झाले होते .
अमरावती येथे २००४ साली घेतलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाच्या आयोजनाची प्रचंड धावपळ होती .
दोस्त मंडळी मदतीला होतीच अगदी सावलीसारखी...अशात नितीने ही गज़ल ऐकवली . ऐकताक्षणी ती मनावर चढली ( सूर अवती-भवती रुंजी घालत असून देखिल ) गळ्यावर चढवायला उसंत मिळाली नाहीच .
संमेलनाचा समारोप माझ्या मैफिलीने व्हावा हा सर्वांचा प्रेमळ आग्रह ,आणि ही गज़ल ऐकवून नितीनला सरप्राईज द्यायचे हा माझा मनसुबा ...!
संत ज्ञानेश्वर रंगमंदिर खचाखच भरले होते , रसिकांना मनोभावे नमन केले , कोणतीही प्रत्यक्ष तालीम न करता केवळ मनात रुंजी घालत असलेल्या मिश्र चारुकेशी रागाच्या सुरावटीवर हवाला ठेवून षड्ज लावला..
या गज़लची पेशकश म्हणजे एक ध्यानयात्रा होती माझ्यासाठी . बस , गात गेलो , गात गेलो .. भानावर आलो ते टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने !
सुखाच्या शोधात फिरताना आसवांचा झराच कसा भेटला ही नितीनची कैफियत सार्थ ठरविण्यासाठी लक्ष्मण जेवणेचा एक शेर ऐनवेळी माझ्या मदतीला धावला ...
माझ्या घरी सुखांचा जेव्हा जमाव झाला
अन नेमका घराचा तेव्हा लिलाव झाला ...
तर सुरवातीला -
जेष्ठ गझलकार देविदास पाटील यांच्या -
कळा त्या सोसतांनाही कुणाला बोललो नाही
उपाशी मी जरी होतो , अधाशी वागलो नाही..
या मिसऱ्यांनी गज़लची भूमिका बांधली ...
अशी ही अनोखी गज़ल आज पेश आहे तुमच्यासाठी.
जरूर ऐका मित्रांनो ...!
स्नेहाभिलाषी ,
गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
Gazal Nawaz #BhimraoPanchale
For More Updates Follow Me At -
______________________________________________________________
★ Facebook https://bit.ly/BhimraoPanchaleFB
★ Twitter https://bit.ly/BhimraoPanchaleTweet
★ Instagram https://bit.ly/BhimraoPanchaleInsta...
Subscribe To My YouTube Channel -- @gazalnawazbhimraopanchale6816
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: