Dombivli Doctor Attack : शिंदेंच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण, CCTVत सगळं कैद, संपूर्ण स्टोरी
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-07-07
Просмотров: 12965
Описание:
Dombivli Doctor Attack : हा व्हिडीओ आहे कल्याण-डोंबिवली मनपा रुग्णालयातील. महापालिकेच्या कोपर परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी शिंदेंच्या एका नगरसेवकानं डॉक्टरांना मारहाण केलीय. या घटनेनंतर निषेधार्थ सर्व हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्राचे डॉक्टर व परिचारिकांचे कामबंद आंदोलन केलं. ही घटना नेमकी का घडली ते पाहूयात.
या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे की शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे डॉक्टरांना मारहाण करताहेत शिवाय धमक्याही दिल्यात. आता हे का झालं ते पाहूयात. सोमवारी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचे सीझरद्वारे बाळंतपण करण्यात आले. नवजात बाळाच्या प्रकृतीसंदर्भात काही अडचणी होत्या. शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU पूर्ण क्षमतेने भरलेला असल्यामुळे बाळाला तेथे दाखल करणे शक्य नव्हते. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी बाळाला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त असल्याने त्यांना मोबाईलवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नगरसेवक महोदय रुग्णालयात पोहोचले.
त्यानंतर या नगरसेवकानं डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात डॉ. वैभव साळुंखे जखमी झालेत. डॉक्टरांच्या बचावासाठी पुढे आलेल्या परिचारिका नमिता उबाळे आणि द्रव्या गिरी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्याच्या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व शासकीय हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्राचे डॉक्टर व परिचारिकांचे कामबंद आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे रुग्णालयातील ओपीडी सेवा पूर्णपणे बंद राहिली, मात्र इमर्जन्सी सेवा सुरू होती. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारे आणि मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
Dombivli Doctor Attack : शिंदेंच्या नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण, CCTVत सगळं कैद, संपूर्ण स्टोरी
#DombivliDoctor #DoctorMarhan #DoctorAttack
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: