BVDPKM Sangli -Kirtan Day2- Dt.9/1/2026 Sri Guru Yogiraj Maharaj Gosavi
Автор: BVDPKM, Sangli
Загружено: 2026-02-25
Просмотров: 57
Описание:
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. पतंगराव कदम यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताहांतर्गत महाविद्यालयात दोन दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन भारती विद्यापीठ शालेय विकास समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी सांगली चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष मा. श्री. मनोहर सारडा (काकाजी), रामनिकेतनचे मा. श्री. दीपक (नाना) केळकर, महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य आणि भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, भारती सहकारी बँक पुणे चे संचालक मा. डॉ. जितेश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज श्रीगुरू योगीराज महाराज गोसावी यांनी आपल्या कीर्तन सेवेतून उपस्थित श्रोत्यांना भक्तीचे महत्त्व सांगितले. जो भक्ती मार्गाचा अवलंब करतो त्याचे प्रबोधन आपोआपच होत असते. माणसाचे ध्येय नेहमी मोठे असावे. कोणतेही कार्य करण्यासाठी धैर्य असले पाहिजे. केवळ कर्माने माणूस मोठा होत नाही, त्याला भाग्याची साथ लागते त्यासाठी कर्माचा सिद्धांत सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. दोन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात कैवल्यधाम या प्रदीर्घ कीर्तन परंपरेचा विशेष सन्मान म्हणून प.पू. श्री. गुरुनाथ महाराज कोटणीस यांचा सत्कार करण्यात आला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: