श्री क्षेत्र धारेश्वर (पाटण), सातारा मधील प्रतिकाशी | Dhareshwar Temple | Marathi Vlog
Автор: Girish Patankar Vlogs
Загружено: 2020-10-02
Просмотров: 91038
Описание:
"जर कोणाला , 'काशीला' जायला जमले नाही... तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याच्या मध्यावर 'सातारा' जिल्ह्यात पाटण जवळ एक ठिकाण आहे त्याला, प्रतिकाशी समजले जाते, तेथील दर्शन घेतले तर काशीला गेल्याचे पुण्य लाभते अशी वंदता आहे.
त्या ठिकाणचे नाव, "श्री. क्षेत्र धारेश्वर " .
धारेश्वर हे आता पर्यटन स्थळ म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्ध होऊ लागले आहे , कारण आत्ता तिथे थेट देवस्थानापर्यंत रस्ता झाला आहे .
नवीन महाबळेश्वर चा जो सह्याद्रीचा दुर्गम पट्टा आहे त्या भागात हे ठिकाण येते .
पुण्याकडून येत असाल उंब्रज मार्गे पाटण आणि कोल्हापूर कडून येत असाल तर कराड मार्गे पाटण गाठायचे. (पूर्ण रस्त्यांची माहिती खाली दिली आहे )
पाटण ते धारेश्वर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे . निसर्गाच्या कुशीत शिरणे ज्याला म्हणता येईल असा हा मार्ग. तुम्हाला जिथे 'शिव' वावरले अशा सह्याद्रीच्या माथ्यापर्यंत घेऊन जातो. हळू हळू आपण उंच महाबळेश्वर च्या उंचीला येऊन पोहचतो .
तिथून जरासा उतार लागतो , आणि सह्याद्री ला पोखरलेली गुहा लागते , साधारण १०० मीटर लांब आणि ५० मीटर रुंद .तिथे प्राचीन धारेश्वर देवस्थान वसलेले आहे . वरून बारमाही विरळ धबधबा वाहतो आणि आपण धबधब्याच्या आत असतो .
धारेश्वर ची आख्यायिका अशी , रावणाचा वध केल्यावर , रावण ज्याचा भक्त होता तो साक्षात , "शिवशंभू" याची दीक्षा घेण्यासाठी श्रीराम धारेश्वर येथे आले आणि दीक्षा प्राप्त केली . दीक्षा प्राप्त करताना श्री प्रभू रामचंद्रांनी स्वतःचे शीर शिवशंभूना अर्पण केले . श्रीरामाने रावणाचा वध , कपिलाषष्ठीला केला . . योगायोगाने नेहमी कपिलाषष्ठीला येथे जे श्रीरामाचे प्राचीन दगडी शीर आहे त्यातून एअर बबल असलेले पाणी गंगेच्या स्वरूपात बाहेर येते , एअर बबल जास्त असल्याने ते दुधाळ दिसते त्यामुळे त्याला दूध गंगा असे म्हणतात .
येथे पडणारा बारमाही धबधब्याचा धारा जेव्हा कोकणातील राजापूर येथे गंगा येते तेव्हा या धारा कमी होतात असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो . या धारामुळे त्वचा रोग नष्ट होतात व या पाण्याला शेवाळं धरण्याचे प्रमाण कमी आहे .
येथील शिवलिंग दरवर्षी एक तसू भर वर सरकते , पूर्वीची मूळ जागा व सध्याचे ठिकाण यात पाच फुटाचे अंतर आहे .
हे ठिकाण , जगातील जशी प्राचीन अमरनाथ सारखी श्री . शंकराची ठिकाणे आहेत तेवढेच प्राचीन आहे . याला सर्वप्रथम प्रसिद्धी , वीरशैव पंथाचे आदिगुरू श्री . आदिश्वर शिवाचार्य यांनी जगाला प्रथम करून दिली . सदर जागेचा ईतिहास सहाव्या शतकापर्यंत नोंदीस्वरूपात सापडला आहे . सध्याचे तिथे ३१ वे शैवपंथीय गुरु कार्यभार बघतात . अधून मधून येऊन जाऊन असतात .
पांडव काळात , येथे पांडवांनी अधिष्ठान व वास्तव्य केले असे तेथील सध्या वास्तव्य करून असलेले शिष्य माहिती देतात , त्यांच्याशी अजून थोडी ओळख काढली कि तिथे गुहे मध्ये एक गुहा आहे ती बघायला मिळते . तिथे एक भीम जी पंचारती पूजा करताना वापरायचा ती आहे . ती खरोखरच दोन हातानी धरली तर उचलता येत नाही . पूर्ण पितळी आहे . तेथील गुहा कोल्हापूर पर्यंत जाते असे म्हणतात .
धारेश्वर हे ठिकाण , मूल न होणाऱ्या जोडप्यांसाठी नवसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे . कपिलाषष्ठी आणि रामनवमी येथे मूल न होणारी जोडपी पहाटे ३ वाजता विशिष्ठ पूजा करतात आणि नंतर तिथे एक वाहता पाण्याचा स्रोत आहे त्यात हात घालतात , जर लिबू मिळाले तर मुलगा , बिब्बा मिळाला तर मुलगी आणि कोळसा मिळाला तर मूल होत नाही असे तेथील काही जमलेले ग्रामस्थ सांगतात व लोकांना अनुभव येतात असे सुद्धा म्हणतात .
माहिती साभार : पराग वाडके
Route -
From Pune -
Route 1 - Pune - Shirval - Satara - Nagthane - Tarale - Jalav - Mandure - Divashi - Dhareshwar (166 KM)
Route 2 - Pune - Shirval - Satara - Umbraj - Patan - Jungati - Divashi - Dhareshwar (187 KM)
From Mumbai -
Mumbai - Pune - Shirval - Satara - Nagthane - Tarale - Jalav - Mandure - Divashi - Dhareshwar (309 KM)
From Kolhapur-
Kolhapur - Karad - Patan - Jungati - Divashi - Dhareshwar (120 KM)
Follow me on Instagram
/ girishpatankarvlogs
Like me on Facebook
/ girishpatankarvlogs
Follow me on Twitter
/ girishpatankarv
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Microphone - Boya MM1
Tripod - Marklif Flexible Gorillapod
Music:
YouTube Audio Library
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: