Shirdi Sai baba Punyatithi Utsav | शिर्डीत साई बाबा पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ | SP24 Taas
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2024-10-10
Просмотров: 1911
Описание:
Shirdi Sai baba Punyatithi Utsav | शिर्डीत साई बाबा पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ | SP24 Taas
शिर्डीत साई बाबांच्या काकड आरतीनं तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ. 15 ऑक्टोबर 1918 साली विजयदशमीच्या दिनी साईंचं झाल होत महानिर्वाण.. पुण्यतिथि उत्सवाला साईमंदिरासह सजली शिर्डी.
साईबाबांच्या शिर्डीतील विजयादशमी उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झालीय..पाहटेच्या काकड आरती नंतर साईंच्या मुर्तीला मंगलस्नान घालण्यात येऊन साईप्रतीमा , वीणा आणि साईसतचरित्राची साई समाधी मंदीर ते व्दारकामाई पर्यत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली त्यानंतर द्वारकामाई मंदिरात अखंड पारायणाच पठण प्रारंभ होवून उत्सवाची सुरूवात करण्यात आली. मिरवणुक पुन्हा साईमंदिरात आल्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आल. साईंच्या मुर्तीला आज विविध सुवर्ण आभूषण घालण्यात आले असून मंदिराला आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आलीय.. तसेच भव्य साईबालाजी देखावा उभारण्यात आला असून यात भगवान विष्णुचे विविध अवतार दाखवण्या-या मुर्ती स्थापित करण्यात आल्याय.
साईं पुण्यतिथि उत्सवात आज पहाटे पासूनच भाविक मोठया प्रमाणात सामील झाले आहेत...तीन दिवस हा उत्सव चालणार आहे.
उदया उत्सवाचा मुख्य दिवस असल्यान लाखो भाविंकांची मांदीयाळी शिर्डीत पहावयास मिळणार आहे.
#sp24taas #shirdisaibaba #vijayadashami #shirdi #saibaba
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: