PART 3 GOVIND SANSMRAN NAADBRAMHA UTTUNG PT. RAM MARATHE MAHA SEWA SANGH MULUND
Автор: Mukund Marathe
Загружено: 2025-06-12
Просмотров: 4399
Описание:
• PART 1 GOVIND SANSMRAN NAADBRAMHA UTTUNG ... PART 1
• PART 2 GOVIND SANSMRAN NAADBRAMHA UTTUN... PART 2
बोटांनी गाणारा जादूगार.. संवादिनी गंधर्व ... पंडित गोविंदराव पटवर्धन........ मुकुंद मराठे गोविंद शतायुषी संस्मरण"....
( आज २१ सप्टेंबर पासून पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी शुभारंभ होत आहे !!..)
आपल्या मराठी संगीत रंगभूमीला १८१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे... त्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार, गायक,गायिका,लेखक,दिग्दर्शक, नेपथ्यकार,रंगभूषा,वेशभूषाकार, अभिनेते नट यांच्याबरोबर............
अत्यंत महत्त्वाचे असे योगदान आहे..ते म्हणजे.. ऑर्गन आणि तबलावादकांचे.......
बालगंधर्व काळातील पं.गोविंदराव टेंबे,हरिभाऊ देशपांडे,केशवराव कांबळे,अनंतराव लिमये आणि.. यांच्यानंतर ज्यांनी पुढील काळ पूर्णतः संगीत रंगभूमीवर गाजवला.. ते ज्येष्ठ हार्मोनियम आणि ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन हे नाव अत्यंत आदरणीय आणि एकमेवाग्रणी असे आहे...
(जन्म.. गुहागर, कोंकण..जवळील अडूर या खेडेगावी..)
नटसम्राट बालगंधर्व, विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व्यास, हिराबाई बडोदेकर, स्वरराज छोटा गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व सुरेश हळदणकर, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे,जसराज,मल्लिकार्जुन मन्सूर, बसवराज राजगुरू,
प्रसाद सावकार,रामदास कामत, जयमाला शिलेदार,नीलाक्षी जुवेकर, सुहासिनी मुळगावकर, मालिनी राजूरकर, सुरेश वाडकर.. अशा असंख्य गायकांबरोबर त्यांनी साथसंगत केली. हिंदुस्तानी शास्त्रीय,नाटय सुगम संगीतातील जवळजवळ सर्वच गायक गायिकांना त्यांनी साथसंगत केलेली आहे. ही कलाकारांची संख्या किमान हजारच्या पुढे नक्कीच जाईल. कित्येक तत्कालीन युवा गायकांना मार्गदर्शनही केले आहे, तर काही नाट्यकृतींना गोविंदरावांनी संगीतबद्ध देखील केल आहे...
गोविंदराव ह्यांची साथसंगत म्हणजे
गायकाच्या गाण्याची जणू प्रतच वाटत असे...
... गोविंद रावांनी कुणाकडेच शास्त्रशुद्ध असे शिक्षण घेतले नव्हते आणि तरीही आठव्या वर्षी आपल्या गावी उत्सवात संगीत नाटकाची साथ केली... तर तेराव्या वर्षी चक्क मास्टर दिनानाथ मंगेशकर यांना ऑर्गनची साथ केली...
गोविंदरावांनी आपल्या प्रदीर्घ अशा 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किमान 12 हजार नाट्य प्रयोग ( नाटकांची संख्या 50 च्या पुढे...) आणि 5 हजाराहून अधिक अशा शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना (चार ते पाच चालणाऱ्या) साथसंगत केली.... ( यामध्ये दुरितांचे तिमिर जावो याचे साधारण 4000 आणि जय जय गौरीशंकर 2000 पेक्षा जास्त....).. नाट्य संगीत आणि संगीत नाटक यासाठी ललितकलादर्शचे नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांना ते गुरुस्थानी मानत... पंडित राम मराठे यांना शास्त्रीय संगीत आणि एकूणच सर्व संगीतासाठी ते गुरुस्थानी मानत... आणि त्यांचे नाते मोठ्या भावासारखे होते...
विशेष म्हणजे त्या काळातील त्यांचे समकालीन वादक सर्वश्री पी. मधुकर, विष्णुपंत वष्ट, तुलसीदास बोरकर,मनोहर चिमोटे,पुरुषोत्तम वालावलकर,आप्पा जळगावकर, विश्वनाथ पेंढारकर, माधव कुंडले, वासंती म्हापसेकर, अनंत केमकर, एकनाथ ठाकूरदास, उदय गोखले,अनंत राणे,पु. ल. देशपांडे इत्यादी सर्वच वादक.. सुस्वभावी, शांत अशा विनयशील नम्र...आणि अजातशत्रू गोविंदरावांना अत्यंत विनम्रपणे मानत असत...आणि ह्या सर्वांचे आपापसात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते...
आज देखील या दिग्गज वादकांचे शिष्य परिवार,तसेच एकलव्य स्वरूपी अनेक अनुयायी व अनुचर आहेत... त्यांच्यासाठी गोविंदराव पटवर्धन, पी मधुकर, विश्वनाथ पेंढारकर, तुळशीदास बोरकर हा हार्मोनियम / ऑर्गन वादनातील अखेरचा शब्द आहे....स्वतःच्या आणि हार्मोनियमच्या श्वासाइतकाच त्यांच्यासाठी प्राणस्वरूप आहे.....
या अवलिया कलाकाराच्या.. वादनातून अनेकांना हार्मोनियम वाजवायला, शिकायला प्रेरणा व ऊर्जा मिळाली.. आणि आज देखील मिळत असून, त्यामुळे गोविंदरावांनी एका अर्थाने "पेटीसंवर्धन" करण्याचे अनमोल कार्य केले आहे...
आणि म्हणुनच गोविंदराव सर्वार्थाने "संवादिनी - ऑर्गन गंधर्व" होते...
त्यांच्या वादन प्रेरणेतूनच उत्तम अशी.. हार्मोनियम, ऑर्गन साथसंगत व स्वतंत्र वादन सध्याची युवा पिढी अत्यंत सक्षमपणे करत आहे.....
गोविंदराव ह्यांचे अनेक अनुयायी, शिष्य,अनुचर आणि तमाम रसिक वर्ग संपूर्ण हिंदुस्थानात आणि जगभर पसरलेला आहे....
गोविंदरावांचे हार्मोनियम आणि ऑर्गन वादनाचे स्मरण असे जागोजागी सतत आणि ह्या वर्षी अधिक होणे महत्त्वाचे तसेच औचित्यपूर्णही आहे.
खऱ्या अर्थाने हीच त्यांना आदरांजली असेल...
जय गोविंद.....
मुकुंद राम मराठे..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: