पंडित दीनदयाळ, गोळवलकर गुरुजी, हेगडेवार आमची विचारधारा नाही - ढोबळे कन्या कोमल साळुंखे यांचे ठाममत
Автор: Sinhasan Times
Загружено: 2021-01-10
Просмотров: 656
Описание:
पंढरपूर :- माजी मंत्री तथा भाजपा नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषदेची विचारधारा ही पंडित दीनदयाल उपाध्याय ,गोळवळकर गुरुजी अथवा हेडगेवार नसून फुले-शाहू- आंबेडकर-अण्णाभाऊ साठे हीच असल्याचे ठाम मत बहुजन रयत परिषदेच्या नुतन महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुंखे ढोबळे यांनी मांडले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या निमित्त कोमल ताई यांचा सत्कार पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
माजी मंत्री प्रा. ढोबळे सर यांनी आपल्या समाजकारणाची आणि राजकारणाची सुरुवात फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन केली होती. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर ही विचारधारा मांडताना प्राध्यापक ढोबळे यांना अडचण येऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या कन्येच्या खांद्यावर बहुजन रयत परिषदेची धुरा सोपवली असं बोललं जात आहे.
तसेच ढोबळे सर राजकीय संन्यास घेणार का? याचे उत्तर नाही असे कोमल साळुंखे यांनी सांगितले. आपली निवड फक्त बहुजन रयत परिषद संघटना वाढवण्यासाठी झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून फक्त महिलांसाठीच नाही तर बहुजन समाजासाठी आपण कार्यरत असणार आहे. बहुजन समाजाने उद्योजक बनावं यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभ प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव ,अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार नानासाहेब वाघमारे, प्रकाश खंदारे, किशोर खिलारे, नाथा यादव, बादल यादव, गोपाळपूर ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य विक्रम आसबे, भोला साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: