धनगराची मेंढरं/निसर्गाची देणगी/आवर्जून पहावी धनगरांची मेंढर/Dhngranhi Mendhr video/आवाज/volume
Автор: गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या
Загружено: 2024-05-30
Просмотров: 60
Описание:
खालील लेख वाचा /Read the under Sheeps information
महाराष्ट्रातील धनगरांची मेंढर व्हिडिओ/Nature gift
मित्रहो,
गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चैनल वर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
मित्रहो खालील माहिती मध्ये प्राण्यांविषयी मेंढरा विषयी माझे मनोगत व्यक्त केले आहे ्.तुम्हही आवर्जून वाचा
आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि लेख आवडलेस व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअरही करा.
या जगात अनेक प्रकारचे जीव राहतात. त्यांची गनती आपण करू शकत नाही. विविध जातींचे विविध रंगांचे प्राणी या पृथ्वीतलावर राहतात. त्यामध्ये पाळीव प्राणी, जंगली प्राणी ,पाण्यातले प्राणी,हवेत उडणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, असे प्राण्यांचे प्रकार असतात. आणि असे प्राणी निसर्गतःच विविध रंगांनी, विविध दिसण्यानी तसेच प्रदेशानुसार त्यांच्या राहणीमानात संखेत बदल असतो.
मानवी जीवनापेक्षा त्यांचे जीवन खरं तर खूपच वेगळे असते. त्यांचे आवाज प्रत्येकाचे वेगळे असतात परंतु ते काय म्हणतात हे आपल्याला समजत नाही. त्यांच्या त्यांच्या भाषेत तरी ते एकमेकांशी संवाद कसा साधतात हेही आपणास उमगत नाही. परंतु हे निसर्गाची देणगी असलेले प्राणी जरी बोलता येत नसले तरी ते नैसर्गिक रित्या छान पैकी जगत असतात. मनुष्याप्रमाणे त्यांना त्यांच्या भावना मांडता येत नाहीत. आणि त्यांना कोणाशीच बोलता येत नाही. म्हणूनच त्यांना मुके प्राणी असे म्हणतात. मुक्या प्राण्यांविषयी वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पाळीव प्राण्यांना तर त्यांच्या इच्छेप्रमाणे जगता येत नाही त्यांचा मालक त्यांना सोडेल तेव्हाच किंवा त्यांना खायला घालेल तेव्हाच त्यांना खायला मिळते. त्यांना कोणत्याही गोष्टीचे वैयक्तिक स्वातंत्र्य नसते. स्वतःच्या आर्थिक उत्पन्नासाठी व्यवसायासाठी खास करून ते पाळलेली असतात.
माणसाला स्वतःचे दुःख फार मोठे वाटते. परंतु या मुख्य प्राण्यांकडे पाहिले किंवा त्यांचा अभ्यास केला तर त्यांचे दुःख किती मोठे आहे त्यांना कोणता आपल्यासारखा लगेच दवाखाना मिळतो तुम्हीच सांगा. तरीही ते आनंदाने जगतात
तसं तसं तर ईश्वराने त्यांना जन्माला घालून माणसाला त्यांचा आदर्श घेण्यासाठी केवढे मोठे उदाहरण मनुष्य जातीसमोर ठेवले आहे. म्हणूनच आजवर अनेक साधुसंतांनी थोरामोठ्यांनी आवर्जून सांगितले आहे की प्राणीमात्रावर मुक्या प्राण्यांवर दया करा.
पशु पक्ष्यांची प्राण्यांची मनुष्याच्या जीवनाशी तुलना करता मनुष्याचे जीवन त्यांच्या पेक्षा कितीतरी पटींनी सुंदर आहे कारण माणसाला स्वतःच्या भावना मांडता येतात कोणापुढेही व्यक्त होता येते. एका जागेहून दुसर्या जागी जाण्याचे राहण्याचे बिनधास्त स्वातंत्र्य आहे. त्याचा तो कष्ट करून कमावून जगू शकतो त्याला हात पाय दिले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवाला स्वतःची अशी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या जीवावर तो आकाशाला गवसणी घालू शकतो.
म्हणूनच माझे कवी मन आवर्जून मुक्या प्राण्यांना बघत बसते. मला असेच वाटले की त्यांना जवळून पाहत बसते त्यांचे दुःख जाणते आणि मग मी देवाला म्हणते की खरंच देवा त्यांच्यापेक्षा मी खरंच सुखी आहे.
अगदी माझ्याच अंगणात या मेंढरांना यायला मिळालं आणि मला त्यांचे काही क्षण टिपायला मिळाले. आणि त्यांना बघून थोडे दुःख झाले आणि निसर्गाची देणगी किती सुंदर आहे हे बघून आनंदही वाटला.
म्हणून आवर्जून सर्वांनी हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पहा.
सुप्रसिद्ध वर्ल्ड रेकॉर्ड होल्डरराष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कृत कवयित्री,लेखिका , समाजसेविका माध्यमिक शिक्षिका अर्चना सुतार.पाचवड.
धन्यवाद....
thank you
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: