❣️ jaitapur..gaurav geet ❣️ जैतापूर गाव, गौरव गीत ✌️👍🌹
Автор: 🌴 Life in kokan कोकणी जीवन 🌴
Загружено: 2023-10-08
Просмотров: 2504
Описание:
🌹❣️ जैतापूर गाव.. गौरव गीत ✌️👍🌹
गायक- गुरुदेव नांदगावकर, रत्नागिरी
गीतकार- अशरफ हसन मुकरी सर
व्हिडीओ एडिटर - प्रथमेश पांचाळ
गीत ---
अभिमानाने फुलतो ऊर
जिथे उधळते सुख चौखूर
आहे सुंदर माझे, हे जय जय जैतापूर॥धृ॥
स्वागताला माड उभे, कुठे आमराया
गावावरी निसर्गाची, किती किती माया
खाटी माडी, निरा मधूर
आनंदाचा नुसता पूर
आहे सुंदर माझे, हे जय जय जैतापूर॥१॥
उगवत्या दिशेला ही, पसरली खाडी
झिंगे आणि कालवांची, अविटशी गोडी
शंख शिंपले, इथे विपुल
खाणाऱ्यांचे मन आतुर
आहे सुंदर माझे, हे जय जय जैतापूर॥२॥
नाही भेदभाव इथे, नाही जातीपाती
मनोमनी जपलेली, समतेची नाती
भांडण तंट्या पासुनी दूर
इथे विषमता नामंजूर
आहे सुंदर माझे, हे जय जय जैतापूर॥३॥
अशरफ हसन मुकरी सर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: