कार्तिक बाबा धावून ये ( संत श्री. कार्तिक स्वामी महाराज चपराळा भजन ) सुपरहीट भजन
Автор: Prakash Giradkar
Загружено: 2020-04-09
Просмотров: 9908
Описание:
कार्तिक स्वामी महाराज
प. पूज्य ब्रह्मलीन कार्तिक स्वामी महाराज हे मू. चपराळा
तह. चामोर्शि जिल्हा.गडचिरोली ( महाराष्ट्र ) येथे गजानन
महाराज व साईबाबा प्रमाणे अवतरले.त्यांच्या आई वडिलां बद्दल व जन्म गावाबद्दल कुणालाही काहीच माहित नाही.
त्यांची दाढी जमिनीपर्यंत लांब होती. बाबाजी १०० वर्षापेक्षा जास्त जगले. बाबाजींनी वैनगंगा व वर्धा या दोन नद्यांच्या संगमाजवळ ( जेथून प्राणहिता नदीला सुरुवात होते ) घनदाट अरण्यात वास्तव्य केले.तेथे अनेक मोठ्या मंदिरांची उभारणी केली.हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने खूपच नटलेले आहे.हे ठिकाण म्हणजे पृथ्वीवरचे जणू नंदनवनच. या स्थानाला प्रशांत धाम हे नाव देण्यात आलेले आहे.
कार्तिक स्वामी महाराज हे अवतारी पुरुष होते, महाज्ञानी होते.बाबजीच्या दर्शनाला भक्त खूपच लांबून लांबून यायचे. बाबाजींच्या कृपाप्रसादाने रोगमुक्त व्हायचे. बाबाजींचे महाराष्ट्रातील विदर्भात व तेलंगणात लाखो भक्त आहेत. आजही येथे लाखो भक्त येतात व रोगमुक्त होतात येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. येथे हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. हे ठिकाण मनःशांती साठी व भक्तीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे.
कार्तिक स्वामी महाराजांना कोटी कोटी प्रणाम.
आपला
प्रकाश गिरडकर
मू. पो. तलोधी ( बाळापूर)
तह. नागभीड जिल्हा. चंद्रपूर
( महाराष्ट्र राज्य )
________________________________________
कार्तिक स्वामी महाराज यांची मराठी व हिन्दी भजने ऐकण्यासाठी यू ट्यूब वर सर्च करा Prakash Giradkar
____________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: