Chatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी मित्रांचे बोअरवेल ट्रीटमेंट नंतर चे अभिप्राय
Автор: Vishal Bagale Borewell बोअरवेल ला पाणी वाढवा
Загружено: 2024-09-02
Просмотров: 1502
Описание: छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी मित्रांचे बोअरवेल ट्रीटमेंट नंतर चे अभिप्राय (फीडबॅक). येथे आम्ही स्पष्ट करू इच्छितो कि ट्रीटमेंट चा फरक बऱ्याच बोअरवेल ला पडतो आणि पाण्याची चांगली वाढ होते, तरी प्रत्येक बोअरवेल ला फरक पडेल आणि पाण्याची वाढ होईलच असे १००% खात्री देता येत नाही. साधारण ७० ते ८० टक्के बोअरवेल ला समाधानकारक पाण्याची वाढ होते व २० ते ३० टक्के बोअरवेल ला पाण्यात काहीही वाढ होत नाही. शेवटी हि एक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान वर आधारित प्रक्रिया असल्याने ह्यालाही मर्यादा आहेत. प्रत्येक बोअरवेल ला पाण्याची वाढ होईल असे गॅरंटी आम्ही देत नाही आणि काही बोअरवेल ला ट्रीटमेंट नंतर हि काहीही फरक पडत नाही. ट्रीटमेंट चा निकाल हा प्रत्येक बोअरवेल च्या भूगर्भरचनेवर अवलंबून असते. ह्या सर्व गोष्टी ट्रीटमेंट करण्यापूर्वी शेकरी मित्रांना स्पष्ट सांगितले जातात. कसलेही खात्री नसताना नवीन बोअरवेल घेऊन आर्थिक संकटात सापडण्यापेक्षा हा एक कमी खर्चिक पर्याय आपल्याला देत आहोत. तसेच अनावश्यक कोरडे बोअरवेल ना खोदून पर्यावरण चे होणारे ऱ्हास देखील टाळता येते. तरी सर्व बाबींचा विचार करून शेतकरी मित्रांनी ठरवावे कि ट्रीटमेंट करावी अथवा नाही. सदर विडिओ हा शेतकरी मित्रांनी, श्री. विशाल बगले (खनिज अभियंता) यांच्याकडून पाणी वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या बोअरवेल ट्रीटमेंट चा, स्वतः प्रत्यक्षात अनुभव घेतल्या नंतर स्वखुशीने, स्वतःच्या मोबाईल वर बनवून पाठविले आहे. त्यांचे मनापासून आभार. इतर शेतकरी मित्रांच्या संदर्भसाठी आम्ही येथे अपलोड करत आहोत. संपर्क : ८१८० ९५ ५०७०, ७५५८ ३१ ५०७०, ९१७२ ६५ ५०७०, ७७५८ ९१ ५०७० (सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: