🧅 “खमंग आणि चविष्ट कांदा पराठा रेसिपी | सोपी घरगुती पद्धत”
Автор: Renuka,( Kitchen Magic)
Загружено: 2025-11-26
Просмотров: 1148
Описание:
🧅 कांदा पराठा रेसिपी
⭐ साहित्य (2–3 पराठे)
कणकेसाठी:
गव्हाचे पीठ – 1 कप
मीठ – चवीनुसार
तेल – 1 tsp
पाणी – आवश्यकतेनुसार
पुरण/स्टफिंगसाठी:
बारीक चिरलेला कांदा – 1 मोठा
कोथिंबीर – 2 tbsp
हिरवी मिरची – 1–2 (बारीक)
लाल तिखट – ½ tsp
हळद – ¼ tsp
धणे पावडर – ½ tsp
जिरे पावडर – ½ tsp
मीठ – चवीनुसार
---
🍳 कृती
1) कणिक मळून घ्या
गव्हाच्या पिठात मीठ, तेल घालून पाणी टाकत मऊ कणिक भिजवा. 10 मिनिटे झाकून ठेवा.
2) स्टफिंग तयार करा
एका बाउलमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, तिखट, हळद, जिरे-धणे पावडर आणि मीठ मिक्स करा.
(मीठ घातल्यावर कांदा पाणी सोडतो, त्यामुळे स्टफिंग जेवढे गरजेचे तेवढेच वापरा.)
3) पोळी लाटा
कणकेचा गोळा करून लाटून घ्या. मध्ये 1–2 चमचे स्टफिंग ठेवा.
4) कडेने बंद करून पुन्हा हलक्या हाताने लाटा
स्टफिंग आत बंद करून गोल पराठा लाटा.
5) पराठा तवा वर भाजा
तव्यावर तेल/तूप सोडून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.
---
🍽 सर्व्ह कसे करावे?
कांदा पराठा दही, लोणी किंवा चटणीसोबत खूप छान लागतो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: