श्री दुर्गामाता महिषासुरमर्दिनी /श्री भवानी माता मंदिर, दिघी
Автор: RiderMH54
Загружено: 2025-03-18
Просмотров: 50276
Описание:
देवी आणि सांभाचे मंदिर
• अग्निजन्य खडकामध्ये बांधलेले देवी आणि सांभा चे मंदिर हे शैलीनुसार १३ व्या शतकातील आहे. मंदिर एका उंच अधिष्ठानावर असून स्थापत्य योजनेमध्ये गर्भगृह, मंडप | आणि अर्थ मंडप यांचा समावेश आहे. मूळ छत नष्ट झालेले असून गर्भगृहावर शंकूच्या आकाराचे छत आहे ज्यावर कांस्य कलशांची योजना करण्यात आली असून खुल्या मंडपाला पुन्हा शंकूच्या आकाराचे छत आहे. मंदिराचे आतील परिमाण २.७४ मीटर चौरस आणि ५.४८ मीटर उंचीचे आहेत. ज्याच्या मागील भिंतीवर दुर्गा/महिषासुरमर्दिनी ची आधुनिक प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. मंदिराचे अधिष्ठान आणि भिंती दगडी विटांनी बनवलेले असून मुख्य मंडपाचे छत अवरोही वर्तुळांनी बनलेले आहे जे युवतिंच्या प्रतिमे बरोबरच फुलांच्या चित्रांनी देखील, सुशोभित केलेले आहे. गर्भगृहाची द्वारशाखा देखील बारीक कोरीव कामाने सजवलेला असून त्याच्या लिंटेल वर संगीतकार आणि नर्तकांचे शिल्प कोरलेले आहे. अर्धमंडपात सजावटीचे खांब आणि गवाक्षयुक्त भिंत आहे. मंदिराचा बाहेरील भाग अगदी साधा असून समोरील भागात काही शिल्पे कोरलेली आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने दिनांक २४-०६-१९२० च्या अधिसूचना क्रमांक ६७५२ द्वारे हे राष्ट्रीय महत्व असलेले स्मारक म्हणून घोषित केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: