Motivational Speech by Hon. Nitin Bhau - (युवा महोत्सव) - युवकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन
Автор: Dindori Pranit Seva Marg
Загружено: 2018-05-19
Просмотров: 10104
Описание:
आदरणीय नितीन श्रीराम मोरे (भाऊ) :
'युवा महोत्सव' -
वसुधैव कुटुंबकम् या सुत्रातून सत्य, अहिंसा, परोपकार आणि मानवता या मुलभूत तत्वावर उभारलेली समाजव्यवस्था विश्वात ऐक्यता निर्माण करु शकते. नैतिकतेचे अधिष्ठान असलेली समाजव्यवस्था सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करु शकते. आपल्या राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत ज्ञान दुर्लक्षित करुन केवळ पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने आपण बलशाली राष्ट्र निर्माण करु शकत नाही. तर राष्ट्र निर्माणाच्या या कार्यात संस्कार, संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि सर्वधर्म समभावाची नितांत गरज आहे.
याच पार्श्वभूमीवर दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गेल्या सात दशकांपासून बाल व युवा संस्कार अभियान राबवित आहे. संस्कार, संस्कृती, निती, सदाचार, राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव, व्यसनमुक्ती यांचे बीज युवकांमध्ये पेरत विविध समाजहितपर अभियानातून सुसंस्कारीत युवा पिढी घडविण्याचे महत्कार्य प. पू. गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
प. पू. गुरुमाऊलींनी सन २०१८ हे वर्ष ‘युवा प्रबोधन वर्ष’ म्हणून जाहिर केले आहे. त्यानिमित्ताने गुरुपुत्र श्री. नितिनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. २९ एप्रिल २०१८ रोजी युवकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. राज्यभरातून आलेल्या हजारो युवा सेवेकरी व महाविद्यालयीन युवा वर्गांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
युवा महोत्सवातील प्रमुख आकर्षण व वैशिष्टयै
आहार व आरोग्य मार्गदर्शन
योग-प्राणायाम-ध्यान-धारणा
व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन
वेदविज्ञान संशोधन-अध्यात्मामागील विज्ञान
10 वी 12 वी नंतर करिअर संधी मार्गदर्शन
युवकांच्या समस्या व समुपदेशन
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
आय.टी. क्षेत्रात करिअर मार्गदर्शन
युवक युवतींसाठी कायदा मार्गदर्शन
स्वयंरोजगार मार्गदर्शन व नोंदणी
रोजगार सहाय्यता मार्गदर्शन (प्लेसमेंट सेल)
संख्याशास्त्रावरुन व्यवसाय निवड मार्गदर्शन
विविध विमा योजना व गुंतवणुक मार्गदर्शन
शेती, घर व उद्योग वास्तुशास्त्र समुपदेशन
नैसर्गिक शेती, सेंद्रिय व आध्यात्मिक शेती मार्गदर्शन
कृषी व कृषीपुरक व्यवसाय मार्गदर्शन
Pradhan kendra Dindori, Nasik
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: