Diptitai Bhogade Official song
Автор: Dipti Prasad Bhogade
Загружено: 2026-01-24
Просмотров: 6716
Описание:
आदरणीय मतदार बंधू-भगिनींनो,
नमस्कार.
मी सौ. दिप्ती प्रसाद भोगाडे, आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्यासमोर उभी आहे. सत्तेच्या आवडीने नाही, पण सेवाभावाच्या संकल्पाने. समाजासाठी जगण्याचा वारसा मला माझे वडील तसेच माझे सासरे श्री. जयसिंगराव भोगाडे आणि त्यांच्या वडिलांकडून मिळालाय. तोच वारसा पुढे नेण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
‘ग्रामपंचायत’ व ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ च्या निवडणुकांत मी प्रत्यक्ष काम, जनसंवाद आणि निर्णयप्रक्रिया जवळून पाहिली आहे. वाचनातून घडलेली दृष्टी आणि अनुभवातून मिळालेली समज यांवर माझं नेतृत्व मी उभं केलंय.
माझं वचन स्पष्ट आहे-
‘शेतकरी व ग्रामीण कुटुंबांसाठी सक्षम बाजारव्यवस्था, महिलांसाठी शिक्षण व स्वावलंबन, युवकांसाठी कौशल्य व रोजगार, पाणी, आरोग्य व रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा, आणि आपल्या परंपरेचा सन्मान... बैलगाडा शर्यत व भजनी मंडळांना सक्रिय पाठबळ’.
‘विकास फक्त बोलण्यत नव्हे, तर बदललेल्या आयुष्यात दिसला पाहिजे’ हा माझा ठाम विश्वास आहे. पारदर्शकता, संवेदनशीलता आणि परिणामकारक काम हीच माझी ओळख राहील.
‘आपला विश्वास, आपली साथ’ हाच माझा बळकटीचा पाया.
चला, एकत्र मिळून आपल्या गावांचं उज्ज्वल भविष्य घडवूया.
आपली,
सौ. दिप्ती प्रसाद भोगाडे.
.
.
.
#officialsong #political #viral #tranding #दिप्तीताई_प्रसाद_भोगाडे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: