हवामान साक्षरता अभियान

नमस्कार,
माझं नाव "राहुल रमेश पाटील"

आम्ही अंकली,जिल्हा सांगली येथे राहतो.

"भारतीय हवामानशास्त्र" या समुहाचा मी संस्थापक असून या समुहाव्दारे आम्ही "हवामान साक्षरता" ही लोकचळवळ उभी केली आहे.

"हवामान साक्षरता" म्हणजे भारतीय उपखंडात राहताना हवामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे,हे ओळखून सर्व शेतकरी व नागरिकांना हवामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांमध्ये हवामानाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे हा होय.

गेली 5-6 वर्षे हा उपक्रम आम्ही अव्याहतपणे चालवत असून या संकल्पनेचा आज 1 कोटी शेतकरी व नागरिकांना फायदा होत आहे.

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आमच्या सारख्या १ लाख हवामान साक्षर शेतकऱ्यांची फौज उभी करायची आहे आम्हाला!
हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

यासाठी आम्ही सोशल मीडिया साधनाचा‌..जसे कि फेसबुक, व्हाटस् अॅप,वेब पेज,यु ट्युब चॅनल
तसेच,रेडिओ केंद्र, टिव्ही चॅनल व इतर लिखीत स्वरुपात उपलब्ध माध्यमांचा वापर करतो.

हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण सुद्धा या चळवळीत सहकार्य करावे अशी माफक अपेक्षा आहे.