JOINT DIRECTOR ACCOUNTS & TREASURIES AMRAVATI

सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती हे विभागीय कार्यालय वित्त विभागाचे अंतर्गत कार्यरत असुन, या कार्यालयाचे अधिनस्त पाच जिल्हा
कोषागार कार्यालये राज्य शासनाचे जमा व खर्चाचे लेखे तयार करण्याचे कामकाज पार पाडतात. तसेच या कार्यालयामध्ये भांडार पडताळणी , वेतन पडताळणी पथक, व प्रशिक्षण या शाखा आपआपले विशेष कामकाज पार पाडतात. राज्य शासनाचे अधिकारी / कर्मचारी यांना हवे तेथे व हवे तेव्हा दृकश्राव्य माध्यमातुन विविध विषयावर प्रशिक्षण उपलब्ध व्हावे जेणे करुन त्यांचे कार्यालयीन कामकाजामध्ये व त्यांचे व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडुन यावा या उददेशाने या कार्यालयाने स्वयंप्रेरणेने `डिजीटल ट्रेनिंग` हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. या माध्यमातुन विविध कार्यालयीन तेसच व्यक्तिमत्व विकास विषयक चित्रफिती या चॅनेल चे माध्यमानुन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.