स्वामींची कृपा

!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
!! श्री स्वामी समर्थ !!
!! अशक्य ही शक्य करतील स्वामी !!

सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार.
"स्वामींची कृपा" या चॅनेल वर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. जीवनात कष्टाला पर्याय नाही हे जरी खरे असले तरी "स्वामींची कृपा" आपल्यावर असणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. स्वामी कृपेने आयुष्य सावरलेल्या, सुधारलेल्या असंख्य स्वामी भक्तांपैकीच मी एक !! मला आलेल्या प्रचितीमुळेच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत स्वामींची सेवा पोहचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. "स्वामींची कृपा" या आपल्या परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवेकरी घडावेत आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांवर "स्वामींची कृपा" व्हावी हीच स्वामी चरणी प्रार्थना !!
या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास श्री स्वामी समर्थांविषयी मला आणि माझ्यासारख्या इतर असंख्य स्वामी भक्तांना आलेले अनुभव तर सांगेनच पण सोबतच सर्व धार्मिक माहीती, सण-वार, व्रत-वैकल्य, स्वामींच्या सेवा यांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.

"स्वामींची कृपा" या चॅनेलला नक्की subscribe करा ही नम्र विनंती🙏