The Dakkhan Times

दख्खन...
पठारांचा प्रदेश !दऱ्या-खोऱ्याचे संरक्षण असणारा मुलुख,
उर्वरित भारतापासून भाषिक, सांस्कृतिकरित्या वेगळेपण जपणारा आणि त्याचवेळी संपूर्ण भारताचा बहुसांस्कृतिक वारसा सामावून घेत स्वत्वाच्या अस्मिता सातत्याने जागतिकीकरणाच्या उलथापालथितही इमानेइतबारे जिवंत ठेवणारा.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याला दिलेल्या उर्मीने दिल्लीच्या तख्तालाही या मातीत लोळण घ्यायला लावली तो प्रदेश म्हणजे दख्खन !
आजच्या परिस्थितीत हा 'दख्खनपणा' समजून घेण्यासाठी राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक अंगाने राज्यकर्ते व राज्यकारभाराच्या धोराणांची दिशा यांची उकल करण्यासोबत बातमी,साहित्य,कला, समीक्षा,मुलाखती,मत-मतांतरे,चळवळी,इतिहास,माहिती ज्या मुख्य माध्यमांच्या प्रपोगंडाच्या धुराळ्यात गायब असतात अश्यासाठी सत्याची कास आणि न्यायाची चाड धरणारा
सर्व सामान्य माणसांचा हक्काचा आवाज
The दख्खन Times.