Shankar Bharade Official

𝐒𝐡𝐚𝐧𝐤𝐚𝐫 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐝𝐞 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥
शब्दांचे सम्राट कोकणरत्न
शाहीर श्री. शंकर भारदे गुरुजी यांचे अधिकृत डिजिटल माध्यम सादर करीत आहोत.
.
भारदे गुरुजींनी कोकणच्या शक्ती तुऱ्यात आपले पदार्पण केले. कोकणातील सर्वश्रेष्ठ कलेच्या अग्रस्थानी असणारा कोकणाचा शक्ती तुरा खऱ्या अर्थाने गुरुजींमुळेच नावारूपाला आला असे म्हणायला हरकत नाही.पावसाळा सुरु झाला की ढोलकीवर थाप पडायची आणि सर्वत्र चर्चा व्हायची फक्त आणि फक्त नाचाची. गुरुजींना तशी लहानपणापासूनच गाण्याची आणि नाचाची प्रचंड आवड होती.असे असताना गुरुजींनी आपल्या आयुष्यातली पहिली बारी दापोलीतील वाकवली या गावात १९८० साली केली. आणि तेव्हापासून भारदे गुरुजी नावाचा हा शब्दांचा उभा पारिजात अगदी आजही दरवळत आहे. गुरुजींच्या गाण्यातील शब्द सामन्यांच्या तोंडावर एका क्षणात रुळतात.सुटसुटीत लिखाण हा गुरुजींचा हातखंडा आहे. आजवर त्यांनी अनेक अजरामर गाणी लिहिली गायली आहेत. महाष्ट्राचे लोकप्रिय शाहीर आणि कोकणच्या शब्द साहित्य तिजोरीतील एक अमौलिक खजीना म्हणजे शाहीर शंकर भारदे गुरुजी. ज्यांनी आजवर आपले अखंड आयुष्य कलेसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनोरंजनासाठी अर्पण केले.