डाळिंब शेती तंत्रज्ञान.

शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
शेतकरी मित्रांनो गुजरात ,राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये डाळिंबाची लागवड सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.
जशी लागवड वाढत आहे तसे डाळिंब बागेतील समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.
. यामुळे अनेक नवीन शेतकऱ्यांची बाग योग्य माहितीच्या अभावामुळे, चुकीच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च झाल्याने तोट्यात जात आहेत.
आपण या चॅनलच्या माध्यमातून नवीन डाळिंब उत्पादकांना अगदी लागवडीपासून पिक काढणीपर्यंत मार्गदर्शन, तसेच डाळिंब शेतीमध्ये उपयोगात येणारी छोट्या मोठ्या स्वरूपाची यंत्रसामग्री, उपयोग , देखभाल, दुरुस्ती, योग्य निवड अशा स्वरूपाची माहिती आपल्याला मिळणार आहे.
प्रत्येक भागामधील नैसर्गिक हवामान, भौगोलिक परिस्थिती, यांच्या आधारे डाळिंब पिक उत्पादनाच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. आपण आपल्या भागामधील स्थानिक हवामान, भौगोलिक परिस्थिती, यांचा विचार करून निर्णय घ्यावा धन्यवाद.