आपली मिनाक्षीताई

नमस्कार,
मी मिनाक्षीताई सर्वप्रथम सर्व बालगोपाळ आणि लहान मोठ्या सर्वांचेच माझ्या आपली मिनाक्षीताई या youtube chanel वर मनःपूर्वक स्वागत. ह्या चॅनेलवर तुम्हाला भरपूर बालगीते, कविता, मजेदार, कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या गोष्टी, भाषिक खेळ, कलेच्या ऍक्टिव्हिटी पहायला, ऐकायला मिळतील. लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही गोष्टी नक्कीच आवडतात. गोष्टी कोणाला आवडत नाहीत असे विचारले तर सापडणे कठीणच! त्याशिवाय लहान मुलांना गाणी ऐकायला आणि म्हणायला आवडतात. शिवाय त्यांची स्मरणशक्ती चांगली असल्याने ती चटकन पाठसुद्धा होतात. सद्या lockdown च्या काळात मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे तास सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने अध्यापन इथे सुरू असेलच. त्यात थोडा विरंगुळा म्हणून काही कृतियुक्त गाणी अधून मधून असणार आहेत. त्यासोबतच सुंदर चित्रे असणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेतच!
लहान मुलांसोबतच शिक्षकांना ही उपयोगी पडतील अश्या गोष्टी, गाणी, नवनवीन भाषिक खेळ माझ्या चॅनेलवर तुम्हाला नक्कीच पहायला मिळतील.तुम्ही माझ्या Channel ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! चॅनेल आवडल्यास like share आणि subscribe करायला अजिबात विसरू नका!